Home कोल्हापूर डॉ. अण्णासाहेब चौगुले यांना स्मृतीदिनानिमित्त मान्यवरांकडून आदरांजली.

डॉ. अण्णासाहेब चौगुले यांना स्मृतीदिनानिमित्त मान्यवरांकडून आदरांजली.

242
0

राजेंद्र पाटील राऊत

डॉ. अण्णासाहेब चौगुले यांना स्मृतीदिनानिमित्त मान्यवरांकडून आदरांजली.
कोल्हापूर: (राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) पेठ वडगाव शहराच्या वैद्यकीय सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिलेले डॉ. अण्णासाहेब चौगुले यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आधारवड या त्यांच्या स्मृती स्थळ परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली.
डॉ. अण्णासाहेब चौगुले हे पेठ वडगाव शहरातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होते. सर्वसामान्यांना माफक दरात उपचार देणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. डॉ. चौगुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर रोडवरील चौगुले फार्म येथे आधारवड हे स्मृतिस्थळ उभारले आहे. डॉ. अण्णासाहेब चौगुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त खासदार धैर्यशील माने, आमदार राजू आवळे, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष कालिदास धनवडे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव, अशोकराव माने, सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. शिंगे, गुलाबराव पोळ, विजयादेवी यादव, प्रविता सालपे, अजय थोरात, सुनिता पोळ, संतोष गाताडे, संतोष चव्हाण, डॉ ओजस हंचनाळे, सुधाकर पिसे राहुल शिंदे, राजू वायदंडे, दिगंबर पोळ यांच्यासह विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

Previous articleमुंबईतील शाळा सुरू, युवा मराठा न्युजच्या मुंबई प्रतिनिधींनी केली प्रत्यक्ष पहाणी 🛑
Next articleन्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here