Home बुलढाणा ई पास मशीन कायमस्वरूपी शासनास परत करण्याची संग्रामपूर तालुका सरकारी स्वस्त धान्य...

ई पास मशीन कायमस्वरूपी शासनास परत करण्याची संग्रामपूर तालुका सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी..

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20221128-WA0033.jpg

(अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे संग्रामपूर तहसीलदार मार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन!)

ई पास मशीन कायमस्वरूपी शासनास परत करण्याची संग्रामपूर तालुका सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी..

संग्रामपूर तालुका विशेष प्रतिनिधी
(ज्ञानेश्वर पाटील दांदळे)

संग्रामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले की शासनाने दुकानदारांना दिलेल्या ई.पास मशीन कालबाह्य झालेल्या असून त्यामध्ये असलेल्या टू जी मोबाईल नेटवर्कमुळे सर्वर मध्ये बिघाड होऊन नियमित बंद पडतात अनेक गावांमध्ये उंच जागेवर जाऊन सुद्धा ग्राहकांचे अंगठे (थंम) घेतल्या जात नाही एका एका ग्राहकांचे अंगठे घेण्यासाठी अर्धा ते एक तास वेळ लागतो दररोज सकाळी नऊ वाजेनंतर पूर्णतः मशीन बंद पडतात दुपारी सुद्धा अंगठे घेतले तरी येत नाहीत. त्यामुळे कार्ड धारकांना धान्य घेण्यासाठी मजुरी पाडून चार चार वेळा दुकानावर यावे लागते त्यामुळे कार्ड धारकांमध्ये व दुकानदारांमध्ये बाचाबाची होऊन भांडणे सुद्धा होतात. हीच परिस्थिती मागील कित्येक दिवसांपासून सुरू असून अद्याप पर्यंत दिवाळी सणाला मिळालेले धान्य सुद्धा दुकानदार वितरित करू शकले नाहीत. त्यामुळे वयोवृद्ध दुकानदारांच्या तब्येती खराब होत असून त्यांची मनस्थिती बरोबर राहत नाही अनेकांना उच्च रक्तदाबाचा आजार जडलेला आहे तसेच दिवाळी आनंदाची शिधा संच शासनाने सुरुवातीला ऑफलाईन वाटणीचे आदेश दिले होते परंतु आता दिनांक 07 डिसेंबर 2022 पर्यंत सर्वच संच ऑनलाईन करण्याचे आदेश दिलेले आहेत सर्वर मधील समस्येमुळे नियमित धान्य वाटप होऊ शकत नाही. तरी राशन दुकानदार संघटने कडून निवेदनाद्वारे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना शेवटची विनंती केली असून कालबाह्य झालेल्या ह्या मशिनी तात्काळ बदलून घेऊन 4 जी मोबाईल नेटवर्क असलेल्या नवीन मशीन देण्यात याव्यात अन्यथा 30 नोव्हेंबर नंतर केव्हाही आम्ही सर्व मशीन कायमस्वरूपी शासनास जमा करून देऊ त्यानंतर उद्भवणाऱ्या पेच प्रसंगास आम्ही जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. असे निवेदन अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या संग्रामपुर तालुका सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here