Home नांदेड शासन प्रशासन यांना कधी येईल जाग? दिव्यांग व वयोश्री साहित्य मोजमाफ शिबिरातील...

शासन प्रशासन यांना कधी येईल जाग? दिव्यांग व वयोश्री साहित्य मोजमाफ शिबिरातील साहित्य धुळखात दिव्यांग सं. अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर….

86
0

राजेंद्र पाटील राऊत

शासन प्रशासन यांना कधी येईल जाग? दिव्यांग व वयोश्री साहित्य मोजमाफ शिबिरातील साहित्य धुळखात दिव्यांग सं. अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर….
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

केंद्र शासनाच्या वयोश्री व एडिआयपि योजनेअंतर्गत भारतिय कृतिम अंग निर्माण निगम,जिल्हा प्रशासन दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि 10 डिसे 2019ते 26 डिसे 1 9 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सोळा हि तालुक्यात मोठ्या जाहिराती करून लाखो रूपये खर्च करून राजकीय नेते यांच्या उपस्थितीत दिव्यांग वयोश्री मोजमाप शिबिर घेण्यात आले होते .
या शिबिरात ज्या दिव्यांग व वयोवृद्ध हात, पाय नसेल,दात,डोळे यांची तज्ञ डाँक्टरकडुन तपासणी करून त्यांचे मोजमाप घेण्यात आले होते. ते आज दोन वर्षांपूर्वी घेतलेले मोजमाप आज उपयोगात येईल काय? आज जगात कोनाच्या संकटकाळी हे साहित्य ग्रामपंचायत मार्फत वाटप केले गेले असता लाखो रूपये पाण्यात गेले असते काय?
ज्या आशेने पडत झडत दिनदुबळे दिव्यांग वयोवृध्दाना आधार मिळाला नसता काय? हि बाब शासन प्रशासन यांच्या का? लक्षात आली नाही? असो अनेक अडचणी मुळे लक्षात आली नसेल? तेव्हा दिव्यांग संघटनेने निवेदन मोर्चा,शोशल मिडिया आपले लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला असता शासन प्रशासन यांना का जाग आली नाही? नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन जागे व्हावे दिन
दुबळ्याना न्याय मिळावा म्हणून
ज्यांना चालता येत नाही, जगात काय चालले दिसत नाही ऐकू येत नाही, अशाने केलेले आंदोलन लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना का दिसत नाही?
सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलनात या लोकशाहीत न्याय का मिळत नाही?
दिनदुबळ्याना दोन वर्षांपूर्वी घेतलेले मोजमाप शिबिरातील साहित्य आता तरी मिळेल काय शासन प्रशासन जागे होईल काय असा सवाल दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,राजु शेरकुरवार गजानन हंबर्डे, राहुल सोनुले, विठ्ठल बेलकर, ईत्यादी कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध पाक दिले

Previous articleआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटंबियांना आ.डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते १ लाखांचा धनादेश सुपूर्द …
Next articleमाऊली मंदिर संस्थान हसनाळ (प.मू) च्या वतीने माजी आ.हणमंतराव पाटील यांचा सत्कार संपन्न…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here