राजेंद्र पाटील राऊत
माऊली मंदिर संस्थान हसनाळ (प.मू) च्या वतीने माजी आ.हणमंतराव पाटील यांचा सत्कार संपन्न…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे हसनाळ
(प. मू) येथे आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड निवडणूकीमध्ये विजयी झाल्याबद्दल माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माऊली मंदिर संस्थान अध्यक्ष विठ्ठल महाराज शिंदे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्यासाठी सुखद बाब आहे.हसनाळ (प.मू) या छोट्याश्या गावास ज्ञानेश्र्वर माऊली मंदिर सभागृहासाठी मोठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आणि ते काम पूर्णत्वास पण आले आमच्या गावावर अशीच कृपा दृष्टी असावी असे अनुमोदन माहाराजांंनी केले यावेळी गावातील सहकारी सेवा सोसायटी चे चेअरमन बालाजी पाटील शिंदे यांचे ही आभार मानले गेल्या दहा वर्षांपासून ऐक हाती सत्ता मिळून देत ग्रामपंचायत पण ताब्यात ठेवली दर वेळेस सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडली व सर्वसामान्य माणूस निवडणुकीमध्ये उतरवून विजयी केले खरचं चेअरमन साहेबांचे चांगले काम असे हणमंराव पा.यांनी बोलतांना सांगितले यावेळी गावातील उपसरपंच विठल शिंदे ,प्रकाश महाराज शिंदे ,बालाजी वडजे ,गंगाधर शिंदे,यांच्या सह गावातील नागरिक उपस्थित होते.
