Home गडचिरोली रानडुकराची शिकार करून मास विक्री करणाऱ्या तिघांना वनविभागाने पकडले

रानडुकराची शिकार करून मास विक्री करणाऱ्या तिघांना वनविभागाने पकडले

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0018.jpg

रानडुकराची शिकार करून मास विक्री करणाऱ्या तिघांना वनविभागाने पकडले
गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) -रानडुकराची शिकार करणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे ही कारवाई भिकारमौशी ते बोथेडा मार्गावर करण्यात आली.
हेमंत मडावी, डंबाजी जराते, श्याम जराते तिघेही राहणार धुंडेशिवणी तालुका गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत येथील शिकाऱ्यांनी रानडुकराची शिकार करून मास विक्री करण्याच्या बेतात असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला प्राप्त झाली वनक्षेत्र अधिकारी संजय पडवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भिकारमौशी ते बोथेडा या मार्गावर सापळा रचला शिकार केलेले रानडुक्कर घेऊन जाताना तिघांनाही पकडले या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे .
ही कारवाई क्षेत्र सहाय्यक राकेश पांडे,संदीप आंबेडारे ,सिद्धार्थ मेश्राम ,वनरक्षक रुपेश मेश्राम, राजू दुर्गे ,रुपेश आनंद पवार ,गजानन सिडाम यांनी केली आहे .उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा ,सहाय्यक संरक्षक सोनल बोडके यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे .

Previous articleअतिवष्टीमुळे घर कोसळले गोकुलनगरतील वासियांना सय्यदमजीद भाऊ यांनी केली मदत
Next articleपेठ वडगावत भरपावसात विद्यार्थ्यांच्या बसवर कारवाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here