Home गडचिरोली विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे

विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे

53
0

आशाताई बच्छाव

1000356382.jpg

विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे सांत्वनपर भेट…

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

आज सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी १ मे २०२४ ला भट्टीजांब येथील युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी स्व.राहुलदेव दौलतराव गेडाम वय ४२ वर्षे यांची मानेची नस दबल्याने नागपूरला पुढील उपचारासाठी दवाखान्यात जात असताना वाटेत दुर्दैवी मृत्यू झाला होता.

आज विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी गेडाम कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.तरुन घरातील कमावते व्यक्ती गेल्याने या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.या कठीण प्रसंगी आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार व काँग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्ते यांनी गेडाम कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत सांत्वन केले आहे.

याप्रसंगी माजी जि.प.बांधकाम सभापती मा.दिनेश पाटील चीटनुरवार, तालुकाध्यक्ष नितीन गोहने,सिंदेवाहीचे तालुकाध्यक्ष मा.रमाकांत लोधे,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मा.किशोर कारडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार,उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पाल,मा.अनिल मशाखेत्रि,मा.हरिदास मेश्राम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here