Home गडचिरोली वादळवारा, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा

वादळवारा, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा

55
0

आशाताई बच्छाव

1000356392.jpg

वादळवारा, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांची मागणी

ठाकूर नगर येथील नुकसानग्रस्त भागाची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली पाहणी

शासनाकडून व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडून नुकसान ग्रस्त कुटुंबाला तांदूळ व जीवनावश्यक वस्तूंची मदत

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळ वारा व गारपीट झाल्याने शेतपिकांचे व घरादारांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील ठाकूर नगर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना केले.

या अवकाळी पावसाने वादळ वाऱ्याने व गारपिटीने आंबा, फणस, चिकू, केळी,अन्न धान्य यांचे फार मोठे नुकसान केले आहे. तसेच विजांच्या कडकटांमुळे टीव्ही ,फ्रिज, कुलर, सोलर इत्यादी वस्तूचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतीचे व कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे व नुकसानग्रस्तांना यथायोग्य आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

याप्रसंगी त्यांनी स्वतःकडून नुकसानग्रस्त कुटुंबाला ५ किलो तांदूळ १ किलो तेलासह जीवनावश्यक वस्तू देण्याची घोषणा केली. तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही प्रत्येक कुटुंबाला ५ किलो तांदूळ यासह जीवनावश्यक वस्तू देण्यात येत असल्याची माहिती दिली.

याप्रसंगी त्यांनी प्रदीप वैभव, विश्वजीत बाली, रानमोनी बाली, अनिता वैभव यांच्या पडझड झालेल्या घराची पाहणी केली. याप्रसंगी मंडळ अधिकारी श्री ढोरेजी, जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, तलाठी चाटे, तलाठी गुरनुले ,तलाठी ठाकूर नगरचे सरपंच सुजेल पदा , ग्रामस्थ विश्वजीत मंडल ,मोंटू अधिकारी, उत्तम सरकार, विमल दास, मनोज सरकार, विकास मंडल ,प्रशांत हलदर, कार्तिक मंडल ,रवी अधिकारी यांचे सह तालुका महामंत्री विकास मित्र, सरपंच कृष्णा मंडल विजूस मंडल प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleविरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे
Next articleपरळीत श्री महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात केली साजरी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here