• Home
  • राम शिंदेंना रोहित पवारांचा पुन्हा धक्का! जामखेडमध्ये राजकीय पुन्हा भूकंप

राम शिंदेंना रोहित पवारांचा पुन्हा धक्का! जामखेडमध्ये राजकीय पुन्हा भूकंप

🛑 राम शिंदेंना रोहित पवारांचा पुन्हा धक्का! जामखेडमध्ये राजकीय पुन्हा भूकंप 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जामखेड :⭕ जामखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह दहा नगरसेवक आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.

जामखेडमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी घायतडक यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवकपदाचा राजीनामा देणार म्हणून अशीच पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याकरिता घेतलेली पत्रकार परिषद नेमकी कोणत्या वळणावर जाऊन पोहोचते? हे येणारा काळच दाखवून देईल.⭕

anews Banner

Leave A Comment