• Home
  • पुण्यात लाँकडाऊन मधे वाहनांची झाली विक्री !….🛑 ✍️:पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुण्यात लाँकडाऊन मधे वाहनांची झाली विक्री !….🛑 ✍️:पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पुण्यात लाँकडाऊन मधे वाहनांची झाली विक्री !….🛑
✍️:पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कोरोनाच्या आपत्तीमुळे लागू झालेल्या लॉकडाउनमधून जनजीवन आता सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच प्रादेशिक परिवहन कार्यालयही (आरटीओ) आता सावरू लागलं आहे. नोंदणी सुरू झाल्यापासून गेल्या 45 दिवसांत सुमारे साडेसहा हजार नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे.

देशात 25 मार्चपासून लॉकडाउन लागू झाले. आरटीओ कार्यालयेही तेव्हापासून बंद होती. मात्र, राज्य सरकारने परवानगी दिल्यावर 18 मे पासून आरटीओ कार्यालयांत वाहनांची नोंदणी सुरू झाली आहे. तेव्हापासून 30 जूनपर्यंत 6 हजार 525 वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यातून 30 कोटी 23 लाख रुपये आरटीओच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

गेल्या वर्षी याच काळातील वाहनांच्या नोंदणीची तुलना केली असता, 45 दिवसांतील साडेसहा हजार वाहनांची नोंदणी ही सुमारे 30 टक्के असल्याचे निरीक्षण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी नोंदविले. लॉकडाउनच्या काळातील सर्वच व्यवहार ठप्प असताना, साडेसहा हजार नवी वाहने खरेदी होत आहेत, ही समाधानकारक बाब असून वाहन उद्योगांची बाजारपेठ काही प्रमाणात का होईना सावरत असल्याचे लक्षण आहे, असेही त्यांनी सांगितले. येत्या दोन महिन्यांनंतर सणांचा कालावधी सुरू झाल्यावर वाहन विक्री वाढू शकेल, असाही अंदाज त्यांनी वर्तविला.

18 मे ते 30 जून दरम्यान नोंदणी झालेली वाहने

– मोटारसायकल – 3956
– मोटारी – 2083
– रिक्षा – 309
– मालवाहतूक करणारी वाहने – 108
– इतर वाहने – 069
– एकूण वाहने – 6525

– आरटीओच्या तिजोरीत जमा झालेला महसूल – 30 कोटी 23 लाख 36 हजार 975 रुपये…⭕

anews Banner

Leave A Comment