Home नांदेड नायगाव येथे लवकरच पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते जि.प.बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे होणार उदघाटन...

नायगाव येथे लवकरच पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते जि.प.बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे होणार उदघाटन – जि.प.सभापती संजय बेळगे

93
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव येथे लवकरच पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते जि.प.बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे होणार उदघाटन – जि.प.सभापती संजय बेळगे

नायगाव येथे जि.प.बांधकाम उपविभागीय कार्यालयास जिल्हा परिषद सभापती संजय बेळगे यांच्या पाठपुराव्याने मान्यता मिळाल्याची विकासवार्ता आली असून लवकरच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते तर माजी आ. वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या कार्यालयाचे उदघाटन होणार असल्याची माहिती संजय बेळगे यांनी दिली.
या नियोजित व महत्वाच्या कार्यालयासाठी नायगाव च्या ग्रामसचिवालयाची इमारत सध्या निवडण्यात आली आहे.

नायगाव येथे जि.प.बांधकाम विभागाचे कार्यालय होते पण उपविभागीय कार्यालय मात्र बिलोली येथे सध्या कार्यान्वित असल्याने प्रत्येक संबंधित कामासाठी आधी बिलोली येथे जाऊन नंतर नांदेड येथे जावे लागत आहे, अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही अडचण व कामाचा खोळंबा लक्षात घेऊन जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय बेळगे यांनी आपल्या तालुक्यातच कार्यालय व्हावे या साठी पालकमंत्री ना.अशोक चव्हाण व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या सार्वजनिक मागणीचा पाठपुरावा केला होता, त्यांच्या प्रयत्नास आता यश मिळाले आहे.

या सुरू होऊ घातलेल्या नव्या उपविभागीय बांधकाम कार्यालयासाठी सोमवारी मा.आ.वसंतरा चव्हाण, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजयजी बेळगे, जि.प.अधीक्षक अभियंता गहिरवार साहेब, प्रभारी मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, चेअरमन प्रदीप कल्याण यांनी शहरात चार-पाच ठिकाणी पहाणी केली व सर्वानुमते येथील ग्रामसचिवालायाच्या इमारतीची निवड केली आहे या जागेत येत्या काही दिवसातच नव्या कार्यालयाचे रीतसर उदघाटन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली.

Previous articleलेंडी प्रकल्पातील मावेजाची रक्कम न्यायालयाच्या निकालाप्रमाणे द्या,अन्यथा ठिय्या आंदोलन करणार-कलंबरकर
Next articleकोल्हापूर जिल्ह्यात आज   अखेर 65 हजार 277 जणांना डिस्चार्ज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here