Home नांदेड लेंडी प्रकल्पातील मावेजाची रक्कम न्यायालयाच्या निकालाप्रमाणे द्या,अन्यथा ठिय्या आंदोलन करणार-कलंबरकर

लेंडी प्रकल्पातील मावेजाची रक्कम न्यायालयाच्या निकालाप्रमाणे द्या,अन्यथा ठिय्या आंदोलन करणार-कलंबरकर

165
0

राजेंद्र पाटील राऊत

लेंडी प्रकल्पातील मावेजाची रक्कम न्यायालयाच्या निकालाप्रमाणे द्या,अन्यथा ठिय्या आंदोलन करणार-कलंबरकर
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
लेंडी प्रकल्पाच्या बाधित गावातील शेतकऱ्यांनी मावेजासंबंधी न्याय मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाने या बधितांच्या मावेजासंबंधी निकाल दिला.न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे शेतकऱ्यांची रक्कम लेंडी कार्यालयाकडून वाटप केली जात नाही.निकाल दिलेल्या रक्कमेतुन अर्धी रक्कम कपात केली जात आहे.कपात केलेली रक्कम देण्यासाठी,तीन-चार वर्षांचा कालावधी झाला तरी अजून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात नाही.मावेजाच्या रक्कमेवरून लेंडी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक व लूट केली जात आहे.हे सर्व बंद झाले पाहिजे.न्यायालयाच्या निकालाप्रमाणे LAR प्रकरणातील शेतकऱ्यांना मावेजा वाटप करा.अन्यथा लेंडी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता वी.पी.तिडके यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर,उमाकांत वाकडे,राजेश्वर पाटील,स्वाभिमानीचे प्रवीण वाकडे यांनी दिला.
लेंडी हा प्रकल्प 30 वर्षांपासून प्रलंबित आहे.शेतकरी 30 वर्षापासून मावेजाच्या प्रतीक्षेत आहे.न्यायालयाने याचा निकाल दिल्यावर पुन्हा लेंडी कार्यालय मावेजा देतांना शेतकऱ्यांची बेकायदेशीर अडवणूक करून छळ करत आहे.लेंडी कार्यालयातील काही कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांची हेतुपुरस्सर लूट करण्यासाठी,अडवणूक केली जात आहे.शेतकरी या अडवणुकीला पुरता वैतागला आहे.हतबल झालेला शेतकरी कार्यालयाकडून दिलेली रक्कम घेत आहे.हक्काच्या पैशावर शेतकऱ्यांला पाणी सोडण्याची वेळ आली आहे.सर्व बंद होऊन,न्यायालयाच्या निकालाप्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम वाटप झाली पाहिजे.असा इशारा लेंडी कार्यालयाला स्वाभिमानीचे शिवशंकर पाटील यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here