• Home
  • पुणे मेट्रोच्या मार्गावर टीओडी झोन लागू! ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे मेट्रोच्या मार्गावर टीओडी झोन लागू! ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पुणे मेट्रोच्या मार्गावर टीओडी झोन लागू! 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ पुणे महापालिकेपाठोपाठ आता महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाच्या मार्गावर ही टीओडी झोन (ट्रान्झिट ओरिएन्टेड झोन) लागू करण्यास राज्य सरकारने अखेर मान्यता दिली. त्यामुळे या मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात देखील चार एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे.
या मेट्रो मार्गाला राज्य आणि केंद्र सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग इलिव्हेटेड असणार आहे. तर पुणे महापालिकेने महामेट्रोच्या माध्यमातून वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-ते स्वारगेट हे दोन मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे.

हे दोन्ही मार्ग आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावेत, यासाठी मेट्रो मार्गाच्या स्टेशनच्या पाचशे मीटर परिसरात चार एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी द्यावी, अशी शिफारस पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे केली होती. त्यास राज्य सरकारने मध्यंतरी मान्यता दिली….⭕

anews Banner

Leave A Comment