आशाताई बच्छाव
हत्तीच्या हल्ल्यात मृतकाच्या परिवाराला युवा नेता संदीपभाऊ कोरेत यांनी दिली सांत्वना भेट
तीनही परिवारातील सदस्यांचे आस्थेने केले विचारपूस
गडचिरोली ,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
भामरागड तालुक्यातील कियर येथील गोगलू रामा तेलामी वय ५५ वर्षे यांनी गठ्ठा जंगलात चारोळी व मोहफूल गोळा करण्यास गेले असता रानटी हत्ती ने त्याच्यावर हल्ला करून ठार मारले.आणि हिदूर येथे लग्न कार्यक्रम मुळे माता मंदिरात पूजा करण्यास गेलेल्या तीन महिलावर सदर हत्तीने गंभीर हल्ला केल्याने उपचार दरम्यान राजे कोपा हलामी वय ५५ वर्षे आणि महारी देवू वड्डे वय ४७ वर्षे या महिला प्राण गमावले.
जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ अनेक दिवसापासून सुरु असल्यामुळे वन विभागाने सिरोंचं आणि आलापल्ली सारखे सावधानतेचा इशारा जर आपापल्या विभाग हद्दीत दिले असते तर हे हत्ती ने झालेला मृत्यू तांडव कदाचित घडला नसता.
तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून सिरोंचा विभागातील रेपणपली वन परीक्षेत्र जंगलात प्रवेश करताच सिरोंचाचे उपवनसंरक्षक व वनपरीक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी हद्दीत येणाऱ्या सर्व गावात सावधान तेचा इशारा व धवनिक्षेपाने जंगलात न जाण्याचा आणि हत्ती विषय जनजागृत केल्याने त्या परिसरात कुठलीच हानी झाली नाही.
भामरागड वन विभागाच्या निष्काळजी पणामुळे हत्तीने निष्पाप लोकांचे बळी घेतले असल्याचे खंत युवा नेते संदीपभाऊ कोरेत यांनी व्यक्त केले.
कियर व हिदूर येथील हत्ती अपघातग्रस्त परिवाराला भेटी दरम्यान कोरेत यांनी परिवारातील सदस्यांना धैर्य देत अस्थेने विचारपूस केले.यावेळी भाजपचेभामरागड तालुकाध्यक्ष गावातील अर्जुन आलाम,विहिप विभाग सहमंत्री अमित बेझलवार,नागरिक व मृतकाच्या परिवारातील सदस्य उपस्थित






