Home कोल्हापूर पेठ वडगावत भरपावसात विद्यार्थ्यांच्या बसवर कारवाई

पेठ वडगावत भरपावसात विद्यार्थ्यांच्या बसवर कारवाई

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0036.jpg

पेठ वडगावत भरपावसात विद्यार्थ्यांच्या बसवर कारवाई                                                कोल्हापूर,(राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):वाठार वडगाव रस्त्यावर इचलकरंजी कडे निघालेल्या महाविद्यालयाच्या गाडीतील विद्यार्थ्यांना कोल्हापूर विभागातील एका मोटर वाहन निरीक्षकाने भर पावसात रस्त्यावर उतरून त्या बसवर कारवाई केली.या प्रकाराने पालक वर्गात तीव्र प्रतिक्रिया म्हटल्या आहेत.या प्रकाराची संबंधित संस्थेच्या अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री पोर्टल वर तक्रार देखील केली आहे.

मोटर वाहन निरीक्षक पेठवडगाव परिसरात गेली दोन दिवस भर पावसात कारवाई करत सुटले आहेत.मंगळवारी एका नगर परिषदेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यावर ही त्यांनी कारवाई केली.गुरुवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान वठार वडगाव रोडवर एका महाविद्यालयाच्या गाडीतील विद्यार्थ्यांना रोडवर उतरत मोटर वाहन निरीक्षक यांनीआपली गाडी उलट दिशेने लावत असंवेदनशीलतेचा कळसच गाठला.कारवाई करत असताना पावसात बस गाडीतील विद्यार्थ्यांना उतरवणे चुकीचे असल्याने पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.अशाप्रकारे विद्यार्थ्यांना उतरवून कारवाई करणे चुकीचे आहे.मोटर वाहन निरीक्षकाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करणे अयोग्य असून त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस ने देखील परिवहन विभागाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.याची खबरदारी संस्थाचालकांनी ही घ्यावी अशी मागणी होत आहे.

Previous articleरानडुकराची शिकार करून मास विक्री करणाऱ्या तिघांना वनविभागाने पकडले
Next articleआ.मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून जिंतूरात नाट्यगृहासाठी निधी मंजूर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here