• Home
  • मुंबईकर सुटले!

मुंबईकर सुटले!

🛑 मुंबईकर सुटले! 🛑
⭕वेस्टन एक्सप्रेस हायवेवर वाहतुक कोंडी⭕
✍️( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आजपासून काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यात अधिक शिथिलता येताच मुंबईकर अक्षरशः सुटले आहेत. अनेक ठिकाणी ‘बेस्ट’ बससाठी गर्दी पाहायला मिळाली, तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली. मरिन ड्राईव्ह आणि चौपाट्यांवर गर्दीची उदाहरणं ताजी असताना ट्राफिक जामचेही ‘पुनश्च हरि ओम’ झाले.

खासगी कार्यालये 10 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु करण्याला तिसऱ्या टप्प्यात परवानगी मिळाली आहे. मुंबई अनलॉक होताच पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात खासगी वाहने रस्त्यावर उतरली.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. कांदिवली-गोरेगाव भागात पुन्हा पूर्वीप्रमाणे सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाली. अनेक गाड्या एकाच जागेवर बराच वेळ खोळंबून राहिल्या.⭕

anews Banner

Leave A Comment