Home परभणी आ.मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून जिंतूरात नाट्यगृहासाठी निधी मंजूर

आ.मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून जिंतूरात नाट्यगृहासाठी निधी मंजूर

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0043.jpg

आ.मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून जिंतूरात नाट्यगृहासाठी निधी मंजूर

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिंतूर शहरात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी नाट्यगृहाची आवश्यकता असून त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी तात्काळ वर्ग केला जाणार असून यासंदर्भात आ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
शहरातील अनेक वर्षांपासूनची सर्वसामान्य जनतेची मागणी लक्षात घेता आ. मेघना बोर्डीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे पाठपुरावा करून शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एका नाट्यगृहाची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले. आणि याची तात्काळ दखल घेत तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागामार्फत तात्काळ मंजूर करून सदर मंजूर करण्यात आलेला निधी जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना वर्ग करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.
सदरील काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी या यंत्रणेमार्फत करण्यात येणार असून या कामाचे सविस्तर अंदाजपत्रक तात्काळ तयार होऊन लगेचच कामास सुरुवात होणार असल्याचे आ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

Previous articleपेठ वडगावत भरपावसात विद्यार्थ्यांच्या बसवर कारवाई
Next articleपेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा — बालाजी बच्चेवार भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here