Home भंडारा महादेवाच्या प्रतापगडावर व्यसनमुक्ती संकल्प सोहळा व भव्य आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या पार पडला.

महादेवाच्या प्रतापगडावर व्यसनमुक्ती संकल्प सोहळा व भव्य आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या पार पडला.

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_193335.jpg

महादेवाच्या प्रतापगडावर व्यसनमुक्ती संकल्प सोहळा व भव्य आरोग्य शिबीर
यशस्वीरीत्या पार पडला.

500 रुग्णांनी घेतला महाआरोग्य सेवेचा लाभ

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) : काल कर दुःख निवारक दवाखाना भंडारा शिव तीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था व सत्यसाई सेवा संघटना भंडारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवाच्या प्रतापगडावर दि. 08 मार्चला एकदिवसीय व्यसनमुक्ती संकल्प सोहळा, शिव आराधना, व भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यात 500 पेक्षा जास्त रूग्णांनी सेवेचा लाभ घेतला.

शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी, सिद्ध साक्षी आनंददाम किटाळी, कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा, सत्यसाई संस्था भंडारा, विजन अकॅडमी शाखा भंडारा व शाखा लाखनी, संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 08 मार्चला हा उपक्रम सकाळी दहा वाजता पासून आयोजित करण्यात आला होता . यात विविध आजारांबाबत तपासणी व रुग्णांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले तसेच औषधांचे वाटप सुद्धा करण्यात आले.

यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय कहालकर, पंकज कहालकर, शितल चामट, व्यसनमुक्तीचे आजीवन प्रचारक डमदेवजी कहालकर, सत्य साई संस्थानचे श्री. नागपुरे, श्री. माहुले, श्री. चवडे, विजन अकॅडमी शाखा भंडारा व शाखा लाखनीचे प्रा. डॉ. खोब्रागडे, संस्थेचे अध्यक्ष प्रेषिताताई कहालकर, सचिव मीराताई कहालकर, सहसचिव रामदास कामठे, संचालक नरेश टिचकुले, शिरीष निर्वाण, प्रतापगडचे सरपंच भोजराज रोकडे, उपसरपंच उमेश मडावी, डॉ. खोब्रागडे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सहकार्य केले.

Previous articleजागतिक महिला दिन निमित्त मनस्वी ग्रुप आयोजित सामाजिक उपक्रम
Next articleमटाने येथे आदिवासी भील समाज सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here