Home मुंबई जागतिक महिला दिन निमित्त मनस्वी ग्रुप आयोजित सामाजिक उपक्रम

जागतिक महिला दिन निमित्त मनस्वी ग्रुप आयोजित सामाजिक उपक्रम

45
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_193011.jpg

जागतिक महिला दिन निमित्त मनस्वी ग्रुप आयोजित सामाजिक उपक्रम

मुंबई: प्रतिनिधी विजय पवार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे मनस्वी ग्रुप यासंस्थेच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा वैजनाथ ग्रामपंचायत, ता. कर्जत या आदिवासी पाड्यामध्ये महिलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी ज्ञान प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांसाठी साडी व शिधा वाटप करण्यात आले. या उपक्रमांमध्ये शेकडो आदिवासी महिलांचा सहभाग होता त्यांना खुप आनंद झाल्याचे त्यांच्या चेहरावरून निर्देशनास आले .

मनस्वी ग्रुपच्या विश्वस्त व माजी जि. प. सदस्या, समाज सेविका सौ. आशा झिमुर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. आपणास हे कार्य करताना व माझ्या भगिनींना ही प्रेमाची भेट देताना मनस्वी आनंद होत आहे असे मत त्यानी व्यक्त कले. तसेच या कार्यास सहकार्य करणारे जीवनविद्या मिशनचे व महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त मंडळ आणि वैजनाथ ग्रामपंचायतीचे शाळा व्यवस्थापनाचे आभार मानले.
सदर उपक्रमास जीवन विद्या मिशनच्या विद्यमाने विश्वस्त श्री. संतोष सावंत यानी हे सर्व नियोजन केले. व्याख्यात्या सौ. अमिता तावडे यानी सुंदर प्रबोधन केले. ज्ञानसाधना केंद्र दादर शाखेचे सचिव श्री सुजित धावडे, माधव फाटक, मंगेश सळोखे या पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी वैजनाथ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. यमुना कातकरी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता बोराडे, सौ. सोनल पवार यांनी येथील सर्व व्यवस्था पाहिली व सहकार्य केले.
मनस्वी ग्रुपच्या शर्वरी जाधव,वीणा पवार, कुसुम झिमुर, सोनाली झिमुर, दिपाली शिंदे मनस्वी झिमुर यांनी उपक्रमाचे संयोजन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here