• Home
  • मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी येथील रस्त्याची अत्यंत दुर्दशा….

मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी येथील रस्त्याची अत्यंत दुर्दशा….

मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी येथील रस्त्याची अत्यंत दुर्दशा….
मुखेड (प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क) -मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी
ते मुखेड जाणाऱ्या रस्त्यावर ठिक ठिकानी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकास अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी असंख्य खडे पडल्याने रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे याकडे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे मुखेड तालुक्या असल्यामुळे कामानिमित्त तालुक्यांच्या ठिकाणी मुखेड येथे जात असतात सदरील रस्त्यावरून मोटरसायकलने जात असताना तारेवरची कसरत करत जावे लागते एक खड्डा चुकवून पुढे गेले की दुसऱ्या दुसऱ्या खड्ड्यातून गाडी अडकते यातच दररोज छोटे-मोठे अपघात होऊन नागरिक किरकोळ जखमी होत आहेत अशा होणाऱ्या अपघाताला आळा बसवण्यासाठी रस्त्यावर असलेले खड्डे बुजवणे आवश्यक आहे तरी संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे..

anews Banner

Leave A Comment