Home अमरावती महिला कर्मचाऱ्यांच्या रॅलीत स्त्री शक्तीचे दर्शन: महापालिकेद्वारे सर्व महिला कर्मचाऱ्यांची बाईक रॅली.

महिला कर्मचाऱ्यांच्या रॅलीत स्त्री शक्तीचे दर्शन: महापालिकेद्वारे सर्व महिला कर्मचाऱ्यांची बाईक रॅली.

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_192724.jpg

महिला कर्मचाऱ्यांच्या रॅलीत स्त्री शक्तीचे दर्शन:
महापालिकेद्वारे सर्व महिला कर्मचाऱ्यांची बाईक रॅली.
————
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
जागतिक महिला दिनाच्या औचित साधून महिला मतदारांना मतदानाकरता प्रोत्साहित
करण्यासाठी महापालिकेद्वारे सर्व महिला कर्मचाऱ्यांची शुक्रवारी सकाळी ८ वाजता बाईक रॅली काढण्यात आली. स्त्री शक्तीचे दर्शन घडविणाऱ्या या रॅलीत मोठ्या संख्येत महिला सहभागी झाल्या होत्या. रॅली प्रमुख पाहुणे म्हणून खा.डा. अनिल बोंडे,आ. सुलभा संजय खोडके, मनपा आयुक्त देविदास पवार, पोलीस उपायुक्त शिंदे, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे पोलीस निरीक्षक विल्लेकर, आई त्याच्या पत्नी मनीषा पवार, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, महिला बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे उपस्थित होते. महापालिका मुख्यालयाच्या रांगंदनातून गाडीला सुरुवात झाली. त्यानंतर राजकमल चौक ते जस्तंच चौक ते हिरवी चौक ते गर्ल्स हायस्कूल चौक ते पोलीस कल्याण पेट्रोल पंप ते बस स्थानक ते रेल्वे स्टेशन चौक ते राजकमल चौक ते महापालिका मुख्यालय अशा गाडीचा मार्ग होता.२१व्या शतकात महिलेने प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली आहे. आर्थिक शैक्षणिक, तांत्रिक व सामाजिक अशी अनेक क्षेत्र प्रगतीसह सर केली आहेत. त्यांच्यासाठी हा अभिमानाचा दिवस असल्याचे मत याप्रसंगी खा.डा. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले. महिलांमध्ये जन्मजात धीरोदातपणा व शिस्त हे गुण आहेत. अडचणीतून मार्ग काढण्याची कौशल्य असते. कुटुंबाच्या आर्थिक निर्णयात महिलेने सक्रिय सहभाग घेतल्यास कुटुंबाला अर्थनिर्भर होण्यात फायदा होतो, अशा शब्दात आ. सुलभाताई खोडके यांनी शुभेच्छा दिल्या. नंतर लगेच महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी मतदान जनजागृती वर उखाणे स्पर्धा, वेगाने चालणे, लगोरी, थ्रओबआल स्पर्धा संगीत खुर्ची, एक मिनिट गाणे दिलेल्या शब्दावर या स्पर्धेचा आयोजन केले होते. जागतिक महिला दिन निमित्त मनपाद्वारे आयोजित विविध स्पर्धेचा महिलांनी आनंद घेतला.

Previous articleपरळीत सहा.पोलीस निरीक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या; शरीराचे झाले दोन तुकडे
Next articleजागतिक महिला दिन निमित्त मनस्वी ग्रुप आयोजित सामाजिक उपक्रम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here