Home अमरावती टोम्पे महाविद्यालयात कमलाबाई जहागीरदार राज्यस्तरीय स्मृती परिसंवाद

टोम्पे महाविद्यालयात कमलाबाई जहागीरदार राज्यस्तरीय स्मृती परिसंवाद

40
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_192647.jpg

टोम्पे महाविद्यालयात कमलाबाई जहागीरदार राज्यस्तरीय स्मृती परिसंवाद

अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाचे उपक्रम

(मयुर खापरे प्रतिनिधी)
चांदूरबाजार येथील गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात विदर्भ अर्थशास्त्र परिषद, कौटिल्य ज्ञानप्रबोधिनी, अमरावती आणि गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती कमलाबाई व्यंकटेश जहागीरदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मृती राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. करमसिंग राजपूत, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. ज्योती ढोमणे, संगाबाअवि, अमरावती, डॉ. अर्चना तिवारी, पी. आर. पोटे कृषी महाविद्यालय, अमरावती, डॉ. राजेश चव्हाण, कढी महाविद्यालय, परतवाडा तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष भास्करदादा टोम्पे, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. एच. ए.हुद्दा तसेच विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे सचिव डॉ. संजय कोठारी व डॉ. विठ्ठल घिनमिने डॉ. प्रशांत हरमकर उपस्थित होते. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून डॉ. प्रशांत हरमकर यांनी कार्यक्रम आयोजना मागची भूमिका सविस्तर विशद करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रमुख वक्ते डॉ. ज्योती ढोमणे, डॉ. अर्चना तिवारी आणि डॉ. चव्हाण यांनी भारतातील भरड धान्याचे महत्व आणि धोरण या विषयावरील परिसंवादात भरड धान्याचे महत्त्व सांगताना म्हणाले की, जुन्या काळात भरड धान्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जायचे त्यामुळे त्या काळात लोकांचे आरोग्य हे सुदृढ होते. आज मात्र आपल्या शेतीत रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा अशी नगदी पिके घेतली जातात. मानवी आरोग्यास लाभदायक असलेले ज्वारी सारखे पीक आज मोठ्या प्रमाणात घेतल्या जात नाही त्याऐवजी गहू, तांदुळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते आणि आज लोकांनी सुद्धा आपल्या जीवनात भरड धान्याचा वापर न करता गहू आणि तांदुळाचा वापर जास्त केला जातो यात ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे याचा मानवी आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो म्हणून सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. विषमुक्त शेती केली पाहिजे. रासायनिक खतांचा व फवारांचा मोठ्या प्रमाणात वापर जमिनीवर व पिकांवर होत असल्यामुळे त्याचे मानवी आरोग्यास सुद्धा धोके निर्माण झालेले असल्याचे मत मांडले. याप्रसंगी डॉ. एच. ए. हुद्दा व भास्करदादा टोम्पे यांनीही विद्यार्थ्यांना भरड धान्याचे महत्व पटवून दिले. शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष यांनी भरड धान्य म्हणजे काय व त्याचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय कोठारी यांनी केले तर आभार डॉ. जयंत बनसोड यांनी मानले. सदर कार्यक्रमाला डॉ. दि.व्य. जहागीरदार, डॉ. मुक्ता जहागीरदार, प्राचार्य डॉ. वनिता चोरे, डॉ. नीना चवरे, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here