• Home
  • 🛑 आम्ही शिवभक्त परिवार तर्फे दिवाळी :फराळ ,अन्नधान्य ,दैनंदिनी वापरातील वस्तू वाटप

🛑 आम्ही शिवभक्त परिवार तर्फे दिवाळी :फराळ ,अन्नधान्य ,दैनंदिनी वापरातील वस्तू वाटप

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201121-WA0046.jpg

🛑 आम्ही शिवभक्त परिवार तर्फे दिवाळी :फराळ ,अन्नधान्य ,दैनंदिनी वापरातील वस्तू वाटप 🛑
✍️ बदलापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

बदलापूर :⭕अनाथ व गरजू बालकांची सर्वांगीण उन्नती साठी सदैव तत्पर असलेले सत्कर्म आश्रम
बदलापूर येथील बालकांसाठी “आम्ही शिवभक्त परिवारा” तर्फे दिवाळी फराळ, अन्नधान्य, दैनंदिन वापरातील वस्तू, व काही रोख रक्कम देण्यात आली.

आश्रमात वय वर्ष ६ ते १४ वयोगटातील मुले आहेत, खरंतर आई वडिलांच्या सानिध्यात १४ वर्षापर्यंत खेळणं, बागडणं, मस्ती करणं हेच वय असतं.. परंतु आश्रमातील ही मुले आज आई – वडिलांचं छत्र हरपल्यामुळे स्वतः कठोर होऊन मिळेल त्या गोष्टीत आनंद घेत आपलं आयुष्य घालवत आहेत. इथे प्रत्येक मुलाला जबाबदारीचि जाणीव आहे. या मुलांबद्दल खूप सारं लिहण्यासारखं आहेच, पण मी बोलेन तिथे जाऊन प्रतक्ष अनुभव घ्या, त्या मुलांसोबत बोला, त्यांचे एक दिवसाचे मित्र बना…..

तसेच सालाबादप्रमाणे “आम्ही शिवभक्त परिवारातील” छोटे सदस्य माझा मुलगा कु.#देवांश #दीपेश #दळवी याचा वाढदिवस सत्कर्म आश्रमातील मुलांसोबत करण्यात आला.

या कार्यक्रमाला आलेल्या परिवारातील सर्व शिवभक्तांचे आभार व मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासाला काही शिवभक्तांना सरकारी नियमानुसार परवानगी नसल्याने इच्छा असूनही उपस्थितीत राहू शकले नाहीत. त्यांचे सुद्धा आभार.

तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी या उपक्रमात आर्थिक व वस्तुरूपात मदत केली त्यांचे सुद्धा आभार…⭕

anews Banner

Leave A Comment