Home अमरावती जिल्ह्यात १२ परीक्षा केंद्रावर ५,८४२ विद्यार्थ्यांनी दिली’नीट’परीक्षा.

जिल्ह्यात १२ परीक्षा केंद्रावर ५,८४२ विद्यार्थ्यांनी दिली’नीट’परीक्षा.

125

आशाताई बच्छाव

1000346002.jpg

जिल्ह्यात १२ परीक्षा केंद्रावर ५,८४२ विद्यार्थ्यांनी दिली’नीट’परीक्षा.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली’नीट’परीक्षा ही रविवारी अमरावती जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रावर पार पडली. यावेळी ५,८४२ विद्यार्थी परीक्षेला हजर होते. परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्याकडून मोबाईल सह इतर गॅजेट काढून घेण्यात आले. प्रमाणे बूट काढण्यास लावून तपासणी करण्यात आली. तसेच बेल्ट ही परीक्षा केंद्राबाहेरच काढून घेण्यात आले, तर विद्यार्थिनी देखील त्यांच्या गळ्यातील, कानातील तसेच नाकातील दाग दागिने काढल्यानंतरच त्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना’नीट’परीक्षा पास करावी लागते. रविवारी दुपारी २ ते ५,२० या वेळेत ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ६००४ विद्यार्थी पात्र होते. त्यांच्यासाठी जवळपास 12 परीक्षा केंद्र होती परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी११ ते दुपारी१,३० वाजेपर्यंत ची वेळ दिली होती.परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ५६० च्या जवळपास अधिकारी व कर्मचारी ची परीक्षा केंद्रावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अंगाची लाही लाही करणाऱ्या तापात्या उन्हामध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लांबच लांब रांग परीक्षा केंद्रावर पाहायला मिळाली. तसेच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना कठीण प्रक्रियेला समोर जावे लागले. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांची कडक तपासणी करीत त्यांच्याकडील मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, तसेच इतर गॅजेट काढून घेण्यात आले. जे विद्यार्थी बूट घालून आले होते, त्यांचे बूट काढून पूर्ण तपासणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांची बेल्टही काढून ठेवण्यात आले. विद्यार्थिनीच्या हाय हिलच्या सॅंडल तसेच दाग दागिने हे काढून घेण्यात आले. हॉल तिकीट, पासपोर्ट फोटो आणि आधार कार्ड विद्यार्थ्यांना नेण्यास परवानगी होती. विद्यार्थ्यांना पेन देखील केंद्रावरच उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील १२ केंद्रावर एकूण ५,८४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १६२ विद्यार्थी विविध कारणांनी गैरहजर होते.

Previous articleसप्तश्रृंगी गडाच्या शीतकडयावरुन उडी घेत चांदवडच्या प्रेमीयुगुलांची आत्महत्या
Next articleलोकसभा निवडणूक : काँग्रेस पक्षातर्फे सहा निरीक्षकांची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.