Home बीड परळीत सहा.पोलीस निरीक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या; शरीराचे झाले दोन तुकडे

परळीत सहा.पोलीस निरीक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या; शरीराचे झाले दोन तुकडे

116
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_192251.jpg

परळीत सहा.पोलीस निरीक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या; शरीराचे झाले दोन तुकडे

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:०९  राज्य गुप्तचर विभागात (एसआयडी) कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाने परळी वैजनाथ येथे रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बीड एसआयडीला सुभाष दुधाळ हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसापूर्वीच त्यांची पुणे येथे बदली झालेली आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून यातून या आत्महत्याचे कारण समोर येणार आहे. काही महिन्यापूर्वी बीड येथून बदली होऊन सध्या पुणे येथे एसआयडी विभागात कार्यरत असलेले सुभाष दुधाळ यांचा मृतदेह आज सकाळी परळी रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर आढळून आला. शुक्रवारी रात्री नंतर पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी रेल्वे गाडीखाली येऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे. परळी रेल्वेस्टेशन मास्तर यांनी आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये रेल्वेगाडीखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कळविली. यावरून सहाय्य पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. उड्डाण पुलाजवळील रेल्वे पटरीवर एका जणाचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला. मयत व्यक्तीचे नाव सुभाष दुधाळ असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. काही महिन्यापूर्वी बीड येथून बदले होऊन सध्या पुणे येथे एसआयडी विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा हा मृतदेह आहे. मृतदेहाचे दोन तुकडे झाले आहेत. दरम्यान ही आत्महत्या आहे की संशयास्पद मृत्यू याबाबत कोणतेही अद्याप स्पष्टता आलेली नाही. मात्र या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या चिट्टीच्या अनुषंगानेच या मृत्यू मागचे कारण समोर येणार आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleककाणी येथे महादंड नायक भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी. —–
Next articleमहिला कर्मचाऱ्यांच्या रॅलीत स्त्री शक्तीचे दर्शन: महापालिकेद्वारे सर्व महिला कर्मचाऱ्यांची बाईक रॅली.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here