Home उतर महाराष्ट्र ककाणी येथे महादंड नायक भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी. —–

ककाणी येथे महादंड नायक भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी. —–

158

आशाताई बच्छाव

IMG_20240309_114057.jpg

ककाणी येथे महादंड नायक भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी. —————————————-म्हसदी, प्रतिनिधी  श्रीहरी बोरसे:साक्री तालुक्यातील ककाणी येथे आदिवासी युवा प्रतिष्ठानच्या वतीने भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान वीर एकलव्य पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आदिवासी युवा प्रतिष्ठानचे युवकांनी भगवान विर एकलव्य यांचे जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी प्रास्ताविक जीवन आहिरे,यांनी मांडले. प्रवीण अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. अंकुश अहिरे, सुरेश अहिरे, राजू अहिरे, यांनी भगवान विर एकलव्यच्या जीवन कार्याची माहिती देत व शिक्षणाबाबत माहिती दिली व आदिवासींचे समस्या मांडून आदिवासी एकत्र यावे असे आवाहन केले. पोलीस पाटील भगवान दिलीप बेडसे यांनी गावातील कायदा व सुव्यवस्था कशी राखली जावी ही माहिती दिली आदिवासी युवा प्रतिष्ठानचे बबलू गायकवाड, गोकुळ कुवर, गोरख सोनवणे, दादाजी अहिरे,जीवन अहिरे,सनी गायकवाड, महेंद्र अहिरे, सुरेश सोनवणे, जयस सोनवणे, अंकुश अहिरे, प्रवीण अहिरे, राजू अहिरे, सुरेश अहिरे, अशोक अहिरे,लक्ष्मण गायकवाड,सर्व आदिवासी युवा प्रतिष्ठान चे युवकांनी परिश्रम घेतले व उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन गोकुळ कुवर यांनी केले.आभार प्रवीण अहिरे यांनी मानले.व सायंकाळी गावातून भगवान वीर एकलव्यच्या प्रतिमेची बँड वाद्यसह ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

Previous articleमहिला दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने महिलांचा सन्मान संपन्न 
Next articleपरळीत सहा.पोलीस निरीक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या; शरीराचे झाले दोन तुकडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.