Home जालना महिला दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने महिलांचा सन्मान संपन्न 

महिला दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने महिलांचा सन्मान संपन्न 

88

आशाताई बच्छाव

IMG_20240309_092316.jpg

महिला दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने महिलांचा सन्मान संपन्न
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ।  – महिला दिनानिमित्त शुक्रवार (दि 8) रोजी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या महिलांचा सन्मान प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाच्यावतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती कॉन्सीलचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी दिली आहे. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून जालना शहर महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर उपस्थित राहणार असून पीसीएमचे राज्य सरचिटणीस महेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सौ. सीमाताई खोतकर यांच्या  अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
आत्मविश्‍वासासह घेते भरारी नाव आहे तिचे नारी याप्रमाणे महिला त्यांच्या आयुष्यात अनेक जबाबदार्‍या पार पाडतात.  प्रशासकीय, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत महिलांवर पारिवारीक आणि समाजाची जबाबदारी असते. समाजप्रती त्यांची असलेली आपुलकी ही लपुन राहिलेली नाही. या महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या आठ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधत जालना जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही महिलांचा प्रतिनिधीक स्वरुपात सन्मान करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यात प्रामुख्याने अप्पर जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, प्रा. डॉ. ज्योतीताई कुलकर्णी, अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, श्रीमती कमलताई तुल्ले, आयेशाखान मुलानी, कमलताई गिरी, रंजना दाणेकर, ज्योतीताई आडेकर, करुणा मोरे, विद्याताई जाधव, शेख महेजबीन, रोहिणी देऊळगावकर, पुष्पाताई सदावर्ते, श्रीमती पी. एम. बुंदेले, लीणाताई माळोदे, मीनाताई हिरगुडे, निर्मलाताई मुंडलिक आदी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात येणार आला.

Previous articleकायद्यात दुरूस्ती करून केंद्र सरकारने मराठ्यांना टिकाऊ आरक्षण द्यावे – डॉ संजय लाखेपाटील
Next articleककाणी येथे महादंड नायक भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी. —–
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.