Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे बिल्लाळी येथील ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. केराबाई येडूरे व उपसरपंचपदी...

मुखेड तालुक्यातील मौजे बिल्लाळी येथील ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. केराबाई येडूरे व उपसरपंचपदी सौ.विद्याताई कदम यांची बिनविरोध निवड..

113
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे बिल्लाळी येथील ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. केराबाई येडूरे व उपसरपंचपदी सौ.विद्याताई कदम यांची बिनविरोध निवड..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार. (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे बिल्लाळी येथील ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. केराबाई येडुरे व उपसरपंच पदी सौ.विद्याताई कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणुक अधिकारी नायब तहसीलदार श्री मामीलवाड साहेब, ग्राम विकास अधिकारी पवळे साहेब यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.सरपंच पदासाठी सौ. केराबाई माधव येडूरे तर उपसरपंच पदासाठी सौ. विद्याताई विलास कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री मामीलवाड सर यांनी सरपंच पदी सौ.केराबाई येडुरे तर उपसरपंचपदी सौ. विद्याताई कदम यांची निवड घोषित करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ. केराबाई माधवराव येडूरे ,उपसरपंच सौ. विद्याताई विलासराव कदम, व नवनिर्वाचित सदस्य अच्युतराव पाटील, सौ. रमाबाई भिमराव घाटे, सौ. सविता माधव घाटे, सौ. शालिनी मारोती मुगावकर यांचा हार व शाल टाकून सत्कार करण्यात आला.यावेळी पॅनल प्रमुख मा. चंद्रकांत घाटे, अच्युतराव पाटील चेअरमन, धर्माजी पोलीस पाटील, भीमराव घाटे माजी सरपंच ,विलास पाटील ,बालाजी कदम , व्यंकटराव पाटील, अंकुश महाराज, के.के.कदम , मारोती पाटील, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस प्रशासनाकडून श्री केंद्रे साहेब यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यांच्या निवडीबद्दल गावातून व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here