Home पश्चिम महाराष्ट्र जिल्हा बँक देणार शेतकऱ्यांना थेट कर्ज विकास सोसायटी

जिल्हा बँक देणार शेतकऱ्यांना थेट कर्ज विकास सोसायटी

97
0

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हा बँक देणार शेतकऱ्यांना थेट कर्ज विकास सोसायटी
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप. सोलापूर :- कर्जासाठी राष्ट्रीय बँकांकडे वाढलेला ओढा थांबविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक आता थेट कर्ज करणार आहे . शेतीउतायावर इतर बँकांप्रमाणे गहाणखत ( मॉर्गेज ) करून हे कर्ज दिले जाईल , असे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी शुक्रवारी सांगितले . ऐपत आहे . कर्ज परतफेडही करणारा शेतकरी आहे मात्र , विकास सोसायटी मोठ्या थकबाकीत असेल तर सोसायटीमार्फत सध्या कर्ज मिळत नाही . यामुळे प्रामाणिकपणे कर्ज भरणारे शेतकरी राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेतात . हळूहळू मोठे शेतकरी राष्ट्रीय बँकांचे कर्जदार झाले आहेत . यामुळे आता आम्हीही सातबारा असणाऱ्यांना राष्ट्रीय बँकांप्रमाणे गहाणखत करून पाच लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे . थेट कर्ज घेणारा शेतकरी बँकेचा नाममात्र सभासद असला पाहिजे व तो इतर बँकांचा कर्जदार नसला पाहिजे.तर त्याला कर्ज मिळेल . येत्या २२ तारखेपासून सुरुवात होईल , असे कोतमिरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here