Home सोलापूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे आज चित्र स्पष्ट होणार

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे आज चित्र स्पष्ट होणार

93
0

आशाताई बच्छाव

IMG-20220628-WA0001.jpg

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे आज चित्र स्पष्ट होणार

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी विक्रमी 409 उमेदवाराने 430 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अर्ज माघार घेण्याची आज सोमवारी शेवटचा दिवस आहे यानंतर निवडणुकीची चित्र स्पष्ट होणार असून निवडणूक तिरंगी चौरंगी होणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे विठ्ठल कारखाना निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोमाने सुरू आहे
यंदाच्या निवडणुकीत विठ्ठल परिवारात फूट पडली असून युवराज पाटील यांनी स्वतंत्र पॅनल उभा केले संचालक युवराज पाटील डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील बी.पी रोगे यांनी पॅनल कारखान्याचे उभा करून प्रचारास सुरुवात केली आहे यंदाच्या निवडणुकीत विठ्ठल परिवारात फूट पडले असून युवराज पाटील यांनी स्वतंत्र पॅनल उभा केले

आहे विद्यमान संचालक मंडळाने व्यवस्थापन न केल्याने कारखाना आर्थिक संकटात सापडला शेतकऱ्यांची ऊसाची एफ आरपी व कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असल्याने सभासद कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे कारखान्याचा यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊ शकला नसल्याने तालुक्यातील कोट्यावधी रुपयांच्या अर्थकारणाला ब्रेक लागला आहे कारखाना बंद असल्याने सभासद शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याने डीव्हीपी अभिजित पाटील यांनी निवडणुकीत पॅनल उभा केले असून कारखान्याचा गाळप हंगाम सुरु करणार असल्याचे ते प्रचारात सांगत आहेत तर भगीरथ भालके व युवराज पाटील दोघे कारखाना बंद कोणामुळे पडला यावर टिका करीत आहेत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज सोमवार शेवटचा दिवस आहे यानंतर निवडणुकीची चित्र स्पष्ट होणार निवडणूक तिरंगी येणार आहे की चौरंगी होणार आहे

Previous articleज्येष्ठ समाजसेवक लिंबाजी आंद्रे यांचे १०६ व्या वर्षी निधन
Next articleदमदार पावसाच्या आगमनानंतर मेंढपाळाचे मुळ गावाकडे मार्गस्थ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here