Home नांदेड देगलूर बसस्थानकातुन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडुन जुन्या व नविन बसस्थानकात पोलिस चौकी...

देगलूर बसस्थानकातुन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडुन जुन्या व नविन बसस्थानकात पोलिस चौकी उभारावे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांची आगार प्रमुख यांच्याकडे मागणी.

344
0

आशाताई बच्छाव

IMG-20230807-WA0068.jpg

देगलूर बसस्थानकातुन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडुन जुन्या व नविन बसस्थानकात पोलिस चौकी उभारावे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांची आगार प्रमुख यांच्याकडे मागणी.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

देगलूर बसस्थानकातुन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडुन जुन्या व नविन बसस्थानकात पोलिस चौकी उभारावे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांची आगार प्रमुख यांच्या कडे मागणी करण्यात आली यावेळी देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी अनेक मुद्यांना हात घालून बसस्थानकातील अनेक बाबी सोडविण्यासाठी विनंती केली ..
१) कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या दैनंदिन बससेवा व लांबपल्ल्याच्या रातराणी बससेवा (पुणे, आदिलाबाद, मुंबई, लातूर, उस्मानाबाद, अंबाजोगाई, तेलंगणा कामारेड्डी, संगारेड्डी, मेदक, बिदर, पोहरादेवी, बांसवाडा, मुखेड – शिरुर ई.)…
२) उपजिल्हा देगलुर शहरातील बंद करण्यात आलेल्या जुने बसस्थानक व नवीन बसस्थानक परिसरात *पोलीस चौकी* पुन्हा सुरू करण्यात यावे यासंबंधी…
३) जुने बसस्थानक नुतनीकरण स्थगिती चे चौकशी व नुतनीकरणाचे बंद करण्यात आलेले काम त्वरीत सुरू करण्यात यावे यासंबंधी…
४) देगलुर शहर बसस्थानक परिसरातील जागेचे अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या स्टाॅल हटवून कंत्राटी पद्धतीने जागे देण्यात यावी यासंबंधी…
५) जुन्या व नवीन बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावे व धुम्रपान करणार्‍या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व प्रवाश्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधी…
६) उपजिल्हा देगलुर शहरातील बस आगारात किमान २० – २५ नवीन बसेस ची संख्या वाढवणे व नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात यावे यासंबंधी…
७) मोडकळीस आलेल्या बसेस रद्द करण्यात यावे यासंबंधी…

उपजिल्हा देगलुर शहर हे त्रिवेणी संगम असुन तीन राज्याच्या सिमेवर असणारे एकमेव हे देगलुर शहर व शहरालगत ५ किमी अंतरावर आन्ध्र – तेलंगणा राज्य, कर्नाटक राज्य, महाराष्ट्र राज्य असुन शहरातील प्रत्येक बाबतीत दबदबा असणारे उपजिल्हा देगलुर शहर येथे तीन ही राज्यातील जनतेचा संपर्क आपल्या शहराशी येतो. व देगलुर शहरात साधुसंताचे वारसा असलेल्या गुंडा महाराज मठ, मोठे मोठे महाविद्यालय, प्राथमिक व माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालय, मोठे वाचनालय, न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय, पोलीस स्टेशन, मोठे – मोठे बाजारपेठ असुन शहरात सोन्याचांदीचे दालन (शोरूम्स) कपड्याचे शोरुम , किराणा मालाचे शोरुम, मोठे आडत व्यापारी बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजारपेठ व औषधालये, मोठमोठ्या दवाखाने उपचार, वैद्यकीय चिकित्सा, गाड्यांचे मोठमोठे शोरूम्स, व शेतकरी आठवडी बाजार पेठ सर्वगुणसंपन्न असे एकमेव बाजारपेठ देगलुर शहरात असुन दैनंदिन रोजगारासाठी व ईतर सर्व कामे करण्यासाठी विविध शहरातील व राज्यातील लोक देगलुर शहरात येतात. आपल्या देगलुर शहरालगत जवळपास १५० – २०० गावांचा ग्रामीण भागातील जनतेचा संपर्क असून देगलुर येथे देनंदिन कामे दळणवळण व लहान मोठे व्यापारी व्यवसाय करण्यासाठी आपल्या देगलुर शहरात येतात. व आपल्या शहरातील बरेच नागरीक हे आपल्या पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी व विविध निमशासकीय, शासकिय, खाजगी कामे करण्यासाठी दळणवळण यंत्रणा (बससेवा) पुर्वी उपलब्ध होत्या. पण आता सध्या दळणवळण करण्यासाठी बससेवा उपलब्ध नसुन देगलुर यापूर्वी देगलुर आगारातून ग्रामीण भागातील लोकांना येजा करण्यासाठी बससेवा उपलब्ध होती ती आता नाही व लांबपल्ल्याच्या बससेवा कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने व बससेवा उपलब्ध नसल्याने जनतेला दररोज आपला जीव धोक्यात घालून खाजगी गाड्यांमधून शहरात येजा करावे लागत आहे. व या खाजगी गाड्यांमध्ये भरगच्च प्रवासी भरुन वाहतूक करत असुन बरेचसे अपघात नाहक त्रास, शिवीगाळ करणे, जबरदस्तीने पैश्यांची लुट, आवाच्या सव्वा तिकिट आकारणे, प्रवाश्यांना कुठेही सोडून देणे, चोरी, मारामारी करणे, गुंडगिरी दादगीरी करणे व तशी भाषा वापरणे, यासोबतच महिलांच्या सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण झाला असून महीलां, बाल, जेष्ठ नागरीक, युवा ई. सर्व जनतेला आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असुन बऱ्याच दैनंदिन वृत्तपत्रात आपल्याला नेहमी बातमी वाचायला मिळते. यासर्व गंभीर गोष्टींकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असुन प्रवाश्यांच्या हितासाठी देगलुर शहरातील जुने बसस्थानक परिसरात पूर्वी च्या चौकशी केंद्राच्या बाजुला पोलीस चौकी व नवीन बसस्थानक परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकी खालील पोलीस चौकी बंद करण्यात आलेल्या चौकी पुन्हा सुरू करण्यात यावे… याआधी निवेदन दिले असता या आधीच्या वावळे साहेब आगारप्रमुखांनी जनतेच्या हितासाठी बंद करण्यात आलेले पोलीस चौकी त्वरीत सुरू करुन देऊ असे अश्वासन देण्यात आले होते पण या विषयावर अद्याप तरी निर्णय घेतला गेला नाही.
व आपल्या देगलुर शहरातील एसटी महामंडळाच्या बससेवा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्यास :- येथे महीलांना, जेष्ठ नागरिकांना, शैक्षणिक संस्था, संघटना, युवा सर्व, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, शासकिय व निमशासकीय अधिकारी, दिनदुबळे, गरीब, शेतकरी, ग्रामीण भागातील गोरगरिबांना जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत नाही व होणाऱ्या गुन्हे, चोरी लुट, दादागिरी, गुंडगिरी, आवाच्या सव्वा तिकिट वसुली, सुरक्षिततेच्या दृष्टीने व होणाऱ्या अन्यायाला आळा बसेल. व देगलुर आगारातील बससेवा तोट्यात न राहता आगाराचे उत्पन्न देखील वाढेल. व हि बससेवा उपलब्ध करून दिल्याने जनतेचे प्रश्न सुटतील.
म्हणून आगारप्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जिल्ह्याचे प्रमुख व शिष्टमंडळाशी चर्चा करुन बैठक घेऊन
बंद करण्यात आलेल्या लांबपल्ल्याच्या व नवीन सेवा तसेच जवळ च्या बससेवा उदा. देगलुर – नांदेड प्रत्येक अर्ध्या तासाने होते ते बंद केल्याने प्रवाश्यांच्या हाल होत असुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे व तासन तास बसेस ची वाट बघत बसावे लागत आहे त्यामुळे शासकीय कामे व खाजगी संस्था चे कामांना विलंब होत आहे. महाराष्ट्र शासनाने स्वत जनतेच्या सेवे साठी उभारलेले एकमेव दळणवळण यंत्रणा वेळेवर उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांचे गैरसोय होणार नाही.
कायमस्वरूपी लांबपल्ल्याच्या व नवीन बससेवा सुरू करण्यात यावी यासाठी यादी
देगलुर ते पुणे (दररोज सायंकाळी ७ – १० या वेळेस) मार्गे नरसी – मुखेड – लातूर
देगलुर ते पुणे (दररोज सायंकाळी ५ – ८ या वेळेस) मार्गे उदगीर – लातूर
देगलुर ते मुंबई (दररोज दुपारी ४ – ५ या वेळेस)
देगलुर ते आदिलाबाद (दररोज सायंकाळी ६ – ९ या वेळेस)
देगलुर ते उस्मानाबाद (दररोज दुपारी १ – ४ यावेळेस)
देगलुर ते अंबाजोगाई ( दररोज सायंकाळी ७ – ९ या वेळेस)
देगलुर ते कामारेड्डी ( दररोज सायंकाळी (७ – १० यावेळेस)
देगलुर ते संगारेड्डी ( दररोज सायंकाळी ६ – ९ या वेळेस)
देगलुर ते मेदक ( दररोज दुपारी ४ – ७ या वेळेस)
देगलुर ते बिदर (दररोज सायंकाळी ५ – ७ या वेळेस)
देगलुर ते पोहरादेवी (दररोज सकाळी ११ – २ या वेळेस)
देगलुर ते बांसवाडा (दररोज सायंकाळी ७ – ९ या वेळेस)
देगलुर ते हैदराबाद ( दररोज सायंकाळी ८ – १० यावेळेस)
वरील सर्व बससेवा सुरू करण्यात यावे यासाठी शासनाने मोडकळीस आलेल्या बसेस रद्द करण्यात यावे व किमान २० – २५ नवीन बसेस उपजिल्हा देगलुर एसटी आगाराला उपलब्ध करून देण्यात यावे ही मागणी असुन नवीन बसेस उपलब्ध करून दिल्यास जनतेचे प्रश्न सुटतील व आगाराचे उत्पन्न हि वाढेल व नवीन रोजगार उपलब्ध होईल.
जुन्या व नवीन बसस्थानक परिसरात प्रवाश्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असुन त्यावर त्वरित निर्णय घेऊन पाणपोई सुरू करुन प्रवाशांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. व नवीन व जुन्या बसस्थानकात बर्‍याच स्टॉल उभारण्यात आले असुन बसस्थानक परिसरातील जागेचे अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या स्टाॅल हटवून कंत्राटी पद्धतीने जागे देण्यात यावी. यामुळे आगाराला उत्पन्न हि मिळते व नियमानुसार व्यवसाय व व्यवस्थित कामे सुरू राहतील. व गैरव्यवहार होणार नाहीत.
व शहरातील (जुने बसस्थानक) मध्यवर्ती बसस्थानकाचे नुतनीकरणास स्थगिती दिल्याने तेथे डुक्कर जनावरांचा वावर होत असुन घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व सायंकाळी मद्य प्रेमींचा वावर होत असताना दिसुन येत असुन त्या गंभीर गोष्टी लक्षात घेऊन व होणारे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस चौकी ची आवश्यक आहे. नुतनीकरणाचे बंद असलेले काम त्वरित सुरू करावे. व नवीन बरेच बसेस हे फक्त नवीन बसस्थानक परिसरात च भेट देत असुन शहरातील मध्यवर्ती जुने बसस्थानकात भेट देऊनच जावे. यामुळे जनतेचे प्रश्न सुटतील व खाजगी च्या जागी आपल्या एसटी बसेस च्या माध्यमातून दळणवळण उपलब्ध होईल आगाराचे उत्पन्न देखील वाढेल. म्हणून देगलुर शहरातील बस आगार व्यवस्थापकांना (प्रमुख) विनंती करण्यात येते की, त्यांनी या गंभीर विषयावर विचार करून शिष्टमंडळाची बैठक बोलावून त्यांच्या शी चर्चा करुन कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या बससेवा जवळच्या व लांबपल्ल्याच्या बससेवा त्वरीत सुरू करुन देण्यात यावे. अन्यथा शासन नियमानुसार तीव्र जनआंदोलन करण्यात येईल अशा इशारा देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी निवेदनाद्वारे दिला यावेळी देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी ॲड.अवधुत राजकुंटवार साहेब शाहिर माणिकराव कोकले उपस्थित होते.

Previous articleकलियुगात आढळला सत्य युगातील श्रावण बाळ !
Next articleउपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे डायलिसिस विभाग व पी. आय. सी. यु. लहान मुलांच्या दक्षता विभागाचे उद्घाटन संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here