Home नांदेड कलियुगात आढळला सत्य युगातील श्रावण बाळ !

कलियुगात आढळला सत्य युगातील श्रावण बाळ !

154
0

आशाताई बच्छाव

IMG-20230807-WA0104.jpg

कलियुगात आढळला सत्य युगातील श्रावण बाळ !

नागमवाड यांनी वडिलांना यकृत दान देऊन समाजापुढे ठेवला नवा आदर्श

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील अंबुलगा या गावच्या तरुणाने समाजापुढे आदर्श उभा केला आहे. स्वतः वर्ग 2 चा अधिकारी असलेल्या या तरुणाने आपल्या आजारी वडिलांसाठी आपले यकृत दान करून त्यांना जीवनदान दिले.
अंबुलगा (बु) येथील तलाठी पदावरून सात वर्षांपूर्वी निवृत्त झालेले व्यंकटराव नागमवाड यांची तपासणी केली. असता त्यांचे यकृत पूर्णतः खराब झाल्याचे निदर्शनात आले. एआययजे हॉस्पिटल हैदराबाद येथे दाखल करण्यात आले. त्यावेळी पोट विकारतज्ञ डॉ. रेड्डी आणि त्यांचे यकृत खराब झाल्यामुळे त्वरित यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. त्याचा एकुलता एक पुत्र व महिला व बाल विकास अधिकारी मिथुनकुमार नागमवाड वय (34 ) यांनी लागलीच आपल्या वडिलांना यकृत देण्याची तयारी दर्शवली संपूर्ण तपासणी झाल्यानंतर दिनांक 29 जुलै रोजी तब्बल 12 तास ऑपरेशन करून संपूर्ण प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. शस्त्रक्रियेत मुलांचे 60% यकृत वडिलांना प्रत्यारोपण करण्यात आले.या युगात आई-वडिलांची सुश्रुषा न करणारी मुले आपणास पाहावयास मिळतात उच्चशिक्षित मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमाकडे पाठवताना पाहाव्यात मिळते आहे. पण 21 व्या शतकात श्रावण बाळासारखा पुत्र आपणास कमी प्रमाणात पहावयास मिळतो मिथुन कुमार नागमवाड यांनी वडिलांना यकृत दान देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here