Home नाशिक मुळाणेचा शेतकरी पुञ बनला फौजदार, परीसरात जल्लोष

मुळाणेचा शेतकरी पुञ बनला फौजदार, परीसरात जल्लोष

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0055.jpg

मुळाणेचा शेतकरी पुञ बनला फौजदार, परीसरात जल्लोष
पिंगळवाडे /संदीप गांगुर्ड प्रतिनिधी युवा मराठा न्युज
जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना अनेक संकटे समोर उभी ठाकतात; पण या संकटांना न डगमगता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते, असे यश मिळविणारे मुळाणे ता.बागलाण येथील प्रसाद दिलीप रौंदळ(पाटील) हे होय या शेतकरी पुञाने फौजदार बनवून गावात प्रवेश केला,प्रसाद हा एकमेव फौजदार या परीसरातून झाल्याने मुळाने गावासहभाक्षी,चौगाव,कौतिकपाडे,तरसाळी,औदाणे या भागातून त्याचे कौतुक होत आहे,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घेतली व गेल्या वर्षापासून नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत प्रशिक्षणात सहभागी झाला १२०व्या तुकडीचे दिक्षात्न संचलन कार्यक्रम नाशिकच्या कवायत मैदानावर पोलिस महासंचालक रजनीश शेठ व अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसादसह वडील दिलीप रौंदळ,व आई उषा रौंदळ यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध पञक देण्यात आले.प्रसादने आपल्या शिक्षणकाळात शेतीशी निगडित राहून काळ्या आईची सेवा करुन वडीलांना हातभार लावला. प्रसाद लहानपनासून अत्यंत हुशार व बुध्दीमान या बळावर त्याने हे यश मिळवून आपल्या परिवाराचे नावलौकिक केले त्याच्या या यशाबद्दल शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापु पाटील,म.विप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार,आ.दिलीप बोरसे,द्राक्ष बागायतदार अशोक गायकवाड,केला भामरे,माजी आ.संजय चव्हाण, शेतकरी संघटनेचे प्रकाश निकम,गुलाब अहिरे, रविंद्र रौंदळ, रमेश देवरे,माजी सरपंच जिभाऊ पाटील,दगा रौंदळ,दोधेश्र्वर मंदीराचे राजेंद्रपुरी महाराज,माजी प.स.सभापती चिला निकम,आदिंसह ग्रामस्थानी कौतुक केले.

***कोट,,
मनात इच्छा होती मोठ्या पदावर जाऊन माझ्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करेल ती जिद्दीने पुर्ण केली यांचा मला अभिमान आहे,,प्रसाद रौंदळ नवनिर्वाचित पी.एस.आय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here