Home विदर्भ यु.पी.एस.सी. उर्त्तीण आश्विन राठोड यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार अपयशाला न घाबरता आत्मविश्वासाने...

यु.पी.एस.सी. उर्त्तीण आश्विन राठोड यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार अपयशाला न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे जा- आश्विन राठोड

146
0

राजेंद्र पाटील राऊत

यु.पी.एस.सी. उर्त्तीण आश्विन राठोड यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार
अपयशाला न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे जा- आश्विन राठोड

अकोला :सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क-  युपीएससी परीक्षा ही कठीण परीक्षा आहे. परंतु सातत्यपूर्ण परिश्रम व प्रयत्नाने विद्यार्थी आय.ए.एस होवू शकतो. मोठे आव्हान स्विकारताना अनेक अपयश येतात. त्याला घाबरुन न जाता आत्मविश्वासाने सामोर जावे, अशा शब्दात जिल्ह्यातील आयएएस परीक्षा उत्तीर्ण आश्विन राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2020 च्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात अकोला जिल्ह्याचे आश्विन राठोड हे 520 क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहे. त्यांचा आज जिल्हाधिकारी (प्रभारी) सौरभ कटीयार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, शालेय शिक्षण व गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आश्विनी राठोड यांचे आई व वडील उपस्थित होते.
यु.पी.एस.सी. अत्यंत कठीण परीक्षा असून या परीक्षेत आश्विन राठोड यांनी यश संपादन केले ही, जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे. त्यांच्या या यशामुळे यु.पी.एस.सी. परीक्षेची पूर्व तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रेरणा मिळेल, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी (प्रभारी) सौरभ कटीयार यांनी काढले.

सातत्यपूर्ण परिश्रम व प्रयत्नाने विद्यार्थी आय.ए.एस होवू शकतो. मोठे आव्हान स्विकारताना अनेक अपयश येतात. त्याला घाबरुन न जाता आत्मविश्वासाने सामोर जावे, अशा शब्दात आश्वीन राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Previous articleकुठे किती पडलाय पाऊस जाणून घेऊया… जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी!; शेतीचे प्रचंड नुकसान; वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत
Next articleधर्मवीरगडच्या संवर्धनासाठी भूमिपुत्र सरसावले..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here