Home पुणे धर्मवीरगडच्या संवर्धनासाठी भूमिपुत्र सरसावले..

धर्मवीरगडच्या संवर्धनासाठी भूमिपुत्र सरसावले..

120
0

राजेंद्र पाटील राऊत

दौंड ( आकाश लभड प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

किल्ले धर्मवीरगडवरती टीम धर्मवीरगड तर्फे नित्य नियमितपणे रोज सकाळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यस्तंभाची नित्यपूजा होते. 30 गावांचे ग्रुप तयार करून रोज एक गाव नित्यपूजासाठी किल्ल्यावर येते. तसेच महिन्याच्या चौथ्या रविवारी सर्व ग्रुप एकत्र येऊन किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली जाते.त्या मोहिमेसाठी श्रीगोंदा, कर्जत,शिरूर व दौंड तालुक्यातुन शेकडो मावळे धर्मवीरगडवरती येतात. तटबंदीवरील काटेरी झाडे झाडे काढणे,मंदिर परिसरातील कचरा स्वच करणे. अश्या प्रकारे खूप कामे त्या दिवशी मार्गी लागतात. तसेच किल्ल्यावर चालू असलेल्या मोठ्या कामांसाठी मिनीनाथ काका नागवडे, गणेश पालकर ,प्रसाद क्षीरसागर, दिपक टकले, ऋषिकेश पाचपुते, स्वप्नील साठे,भूषण लाळगे,वैभव पाचपुते यांच्या आर्थिक योगदानातून शौर्यस्तंभ परिसर सुशोभीकरण करून त्यात लॉन व फुलांची वेगवेगळी झाडे लावणे,दिशादर्शक व स्थळदर्शक फलक लावणे,पार्किंगसाठी जागा तयार करणे.भवानीमाता मार्ग तयार करून तिथे दोन्ही बाजूला झाडे लावून त्यांना ठिबक करणे अश्या प्रकारे कामे झाली आहेत. या कामांसाठी पेडगाव ग्रामस्थांच व ग्रामपंचायतच खूप सहकार्य लाभले आहे. लवकरच टीम धर्मवीरगडच्या सेवेकर्यांकडून किल्ल्याचा चेहरा बदलेल. धर्मवीर संभाजीराजे यांचं बलिदान डोळ्यासमोर ठेवून भूमिपुत्र धर्मवीरगडचे सेवकेरी म्हणून जोमाने शिवकार्यात उतरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here