Home विदर्भ कै.वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

कै.वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

213

राजेंद्र पाटील राऊत

कै.वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन
अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

अकोला : ( सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-    कै वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज विविध विषयांचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयात ही आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस जिल्हाधिकारी(प्रभारी) सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मीनाक्षी गजभिये, उपवनसंरक्षक के. अर्जुना, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, जिल्हा उपनिबंधक कहाळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी श्री. तिवारी यांनी पीक कर्ज वाटप, पीक विमा योजना, जिल्ह्यातील गौण खनिज बाबत, प्रधानमंत्री आवास योजना,राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना, कृषी विभागाच्या योजना, खावटी अनुदान योजना, कामगार विभागाच्या योजना, निराधारांना द्यावयाच्या अनुदानाच्या योजना, आरोग्य सुविधांबाबत आढावा घेतला.

श्री.तिवारी यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी. त्यासाठी त्यांचे पीक विमा संरक्षणाचा लाभ त्यांना मिळवून द्यावा. तसेच घेतलेल्या पीक कर्जाबाबतही त्यांनी माहिती घेतली. जिल्ह्यात अन्न धान्य वितरणाचा लाभ गोरगरिबांना दिला जातो, त्यासोबतच अंत्योदय योजनेसारख्या योजनांचे लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये,असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना काळात झालेल्या औषध खरेदी तसेच गरीब रुग्णांना योजनांचा लाभ देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. कामगार नोंदणी व त्यानंतर योजनांचा लाभ हा गरीब कामगाराला मिळावा यासाठी यंत्रणेने काम करावे,असेही त्यांनी सांगितले.

Previous articleधर्मवीरगडच्या संवर्धनासाठी भूमिपुत्र सरसावले..
Next articleजिंतुर तालुक्यात संततधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका,सोयाबीन पिकांची लागली पुरती वाट!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.