राजेंद्र पाटील राऊत
जिंतूर( विष्णू डाखुरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 70 टक्क्यावर सोयाबीन कपाशी या पिकाची नुसकान झाले आहे.
जिंतूर या तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांना प्रामुख्याने मोठा तडाखा बसला आहे. तसेच संततधार पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांना झाडावरच कोम फुटले आहे.
नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे 70 टक्क्यावर पिकाचे नुकसान झाले अनेक ठिकाणी कापलेल्या सोयाबीन मातीमोल ठरली आहे. त्यातील काही काळ्या पडल्या
तसेच नेमकी सोयाबीन काढणीच्या हंगामीतही पाऊस सुरू झाला कापूस पिकावरही या पावसामुळे परिणाम आहे
अति पावसामुळे काही शेतीतील बोंड सडले असल्यामुळे उत्पादन शुन्य होणार आहे तर काही ठिकाणी कापूस लालसर होत असल्याचे दिसून येते असल्याने शेतकऱ्यांनी कसे सण साजरे करावे ही चिंता आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसून व जमिनीत खरडून खरीप पिकाचे अतोंनात नुस्कान झाले
संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे
या परिस्थितीत नैसर्गिक संकटाच्या बाबी अंतर्गत पिक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना हक्काचा विमा भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे