Home विदर्भ कुठे किती पडलाय पाऊस जाणून घेऊया… जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी!; शेतीचे प्रचंड...

कुठे किती पडलाय पाऊस जाणून घेऊया… जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी!; शेतीचे प्रचंड नुकसान; वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत

332
0

राजेंद्र पाटील राऊत

कुठे किती पडलाय पाऊस जाणून घेऊया… जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी!; शेतीचे प्रचंड नुकसान; वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत
ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज

बुलढाणा –       आज, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या गत्‌ 24 तासांत जिल्ह्यात काही भागांचा अपवाद वगळता धुव्वाधार पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वाहतुकीसह सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.

बुलडाणा तालुक्यात गत 24 तासांत पावसाने कहर केलाय! तालुक्यात काही भागांत ढगफुटी सदृश्य पावसाची आशंका वर्तविण्यात येत आहे. यातही पाडळी महसूल मंडळात विक्रमी 126 मि.मी. पावसाची नोंद झाली. साखळी पट्ट्यातही अतिवृष्टी झाली असून, मंडळात 79 मि.मी. इतका धोधो पाऊस बरसला. या पावसाने बुलडाणा तालुक्यात कहर केलाय! याशिवाय मोताळा व नांदुरा तालुक्यात 48 मि.मी.पेक्षा जास्त पावसाने हजेरी लावत धिंगाणा घातला.

असा झालाय पाऊस अन्‌ अतिवृष्टी…
संग्रामपूर तालुक्‍यात २४.७ मि.मी., चिखली २९.७ (चांधई मंडळात अतिवृष्टी, ६५.३ मि.मी. पाऊस), बुलडाणा तालुक्‍यात ८९.७ मि. मी. (बुलडाणा मंडळात अतिवृष्टी ८८.८, रायपूर मंडळात अतिवृष्टी ९५.५ मि.मी., धाड मंडळात अतिवृष्टी ७५.५ मि.मी., पाडळी मंडळात अतिवृष्टी ८९.५ मि. मी., साखळी मंडळात अतिवृष्टी ११२.८ मि.मी., देऊळघाट मंडळात अतिवृष्टी ११२ मि. मी. पाऊस), मोताळा तालुक्‍यात ४८.६ मि. मी. (धामणगाव बढे मंडळात अतिवृष्टी ७०.८ मि. मी. पाऊस), नांदुरा तालुक्‍यात ४८.१ मि. मी. (निमगाव मंडळात अतिवृष्टी ६७.३ मि.मी.), देऊळगाव राजा तालुक्‍यात ४५.० मि.मी., मेहकर २६.४ मि.मी., सिंदखेडराजा १६.२ मि. मी., लोणार १५.१ मि. मी., खामगाव ३६.४ मि. मी., शेगाव ३३.३ मि. मी. तर मलकापूर 28 मिलिमीटर, जळगाव जामोद तालुक्यात २८.८ मि. मी. पाऊस झाला आहे.

Previous articleमहविकास आघाडी सरकारला घरचा आहेर…..शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले गंभीर आरोप!
Next articleयु.पी.एस.सी. उर्त्तीण आश्विन राठोड यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार अपयशाला न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे जा- आश्विन राठोड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here