Home नांदेड खरीप हंगामातील पिकावर गोगलगाय चा अँटक. अंकुर निघालेली पिके खाऊन करत आहेत...

खरीप हंगामातील पिकावर गोगलगाय चा अँटक. अंकुर निघालेली पिके खाऊन करत आहेत फस्त

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220708-WA0012.jpg

खरीप हंगामातील पिकावर गोगलगाय चा अँटक.
अंकुर निघालेली पिके खाऊन करत आहेत फस्त
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
जाहूर –
गोगलगाय आणि पोटात पाय अशी म्हण आहे.आता गोगलगाय शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.जाहूर परीसरातील जाहूर सह उंद्री(प.दे),राजुरा बु,औराळ,लोणाळ,चोंडी,भाटापुर,बिल्लाळी,तुपदाळ,मेथी आदी गावात गोगलगाय मोठ्या प्रमाणात आढळत असुन,तिचा वावर शेतकऱ्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.सोयाबीन,कापूस,उडीद,मुग आदी पीक गोगलगाय उद्ध्वस्त करत आहेत.तिचा बंदोबस्त करणेही कठीण असुन औषधी फवारणीला ती जुमानत नसल्याने सारेच शेतकरी हतबल झाले आहेत.तीन चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या नशीबाला चिकटलेल्या गोगलगायी चा बंदोबस्त करण्यासाठी क्रषी विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.कोरोना काळात शेतकऱ्यांच्या खिशाला चुना लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.कधी न दिसणारी गोगलगाय पावसाळ्यात मात्र रस्त्यावर शेतात मुक्त संचार करते.संचार करण्याइतका चंचलपणा तिच्यात नसला तरी तिचे अस्तित्व व रात्री तिच्या हालचाली बघणार्याला डोक्यावर हात ठेवण्यास भाग पाडणार्या आहेत.परीसरात सध्या गोगलगायी चे आस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.अनेक शेतात या गोगलगायी ने धुमाकूळ घातला आहे.

 

मागील तीन चार वर्षांपासून परीसरात मोठ्या प्रमाणात गोगलगाय प्रादुर्भाव वाढला आहे.यामुळे सोयाबीन,कापुस, उडीद,मुग आदी पिकांना पूर्णतः उद्ध्वस्त करत आहे.औषध फवारणीचा गोगलगाय उपयोग होत नाही.त्यामुळे शेतीचे महत्त्वाचे काम सोडून गोगलगाय वेचून शेताबाहेर वेळ आली आहे.
माधवराव पाटील गोणारे (शेतकरी उंद्री प.दे)

गोगलगायी चा प्रादुर्भाव वाढत असताना पिकांचे संगोपन करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.कोरोना संकटात कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांने पेरणी केली.गोगलगाय मुळे डोळ्या देखत नष्ट होत आहेत.
बालाजी भोकरे (शेतकरी उंद्री तांडा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here