Home नांदेड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पुणे जिल्हा युवाध्यक्ष मल्हारी जगताप यांचा...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पुणे जिल्हा युवाध्यक्ष मल्हारी जगताप यांचा अनाथ आश्रमात अन्नधान्य व फळं वाटप करुन वाढिवस साजरा.

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220708-WA0007.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पुणे जिल्हा युवाध्यक्ष मल्हारी जगताप यांचा अनाथ आश्रमात अन्नधान्य व फळं वाटप करुन वाढिवस साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
पुणे: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पुणे जिल्हा युवाध्यक्ष मल्हारी भाऊ जगताप यांचा अनाथ आश्रमात अन्नधान्य व फळं वाटप करुन वाढिवस साजरा करण्यात आला.
देहूगाव येथील वात्सल्य अनाथ आश्रमातील मुलांसोबत केक कापून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत केळी, सफरचंद आदी फळे व डाळ, तेल, तांदूळ, गहू, साखर, बिस्कीट असे अन्नधान्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी साहिल देवकर, आकाश अडागळे, आशिष वाघमारे, अक्षय जगताप, सचिन कांबळे, विशाल भोसले, संदीप माने, अतुल लांडगे, अभिषक शेडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकर सेवा संघाचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व पत्रकार अपला वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा करीत आहेत त्यामुळे संघटनेची विशेष ओळख निर्माण झाली आहे. पत्रकार व त्यांचे कुटुंब यांच्यासाठी तर संघटना कायम कार्य करीत आहे पण आरोग्य विभाग, शिक्षण क्षेत्र व सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनिय कार्य करीत असल्याने संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकारांचे अभिनंदन केले आहे.
मल्हारी भाऊ जगताप यांनी अनाथ आश्रमात अन्नधान्य वाटप करुन वाढदिवस साजरा केल्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष राजन नायर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा. जय कराडे, सरचिटणीस रणजित मोरे, पुणे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब लोखंडे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दाखले, पिंपरी चिंचवड शहर महिलाध्यक्षा मंदाताई बनसोडे, शहाजी भोसले, प्रणव बुर्डे सर्व पदाधिकारी व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here