आशाताई बच्छाव
कँम्प पोलिसांचे दुर्लक्ष की आशिर्वाद? मोसमनदीकाठी खुलेआम सुरु आहे सट्टा जुगाराचा अड्डा! नागरिक त्रस्त!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव- कुठल्याही बाबतीत सदैव सतर्क असलेली पोलिस यंत्रणा कँम्प भागातल्या क्रांतीनगर शेजारील सार्वजनिक शौचालयाजवळ सुरु असलेल्या सट्टा मटका जुगार अड्डयाबाबत गाफील कशी काय असू शकते याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मालेगांव शहारातल्या कँम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शनि मंदीराजवळील पटागणांशेजारी असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ सट्टा मटका जुगाराचा श्रीदेवी,नाईट मिलन,सारखे जुगाराचे बेकादेशीर अवैध धंदा खुलेआम सुरु असून,या भागातली पिढी वाममार्गाला लागत चालली आहे.वास्तविक हा भाग म्हणजे झोपडपट्टीत विभागात मोडणारा ठरत असल्याने लहान लहान बालकासोबतच युवा पिढी देखील या सट्टा मटका जुगारामुळे बरबादीच्या मार्गावर येऊन ठेपली आहे.तर बाया बापडयांना या जुगार अड्डयावर असलेल्या वर्दळीमुळे शौचास जाताना देखील मजबुरीने या अड्डयाचा सामना करीतच जावे लागते.तरी कँम्प पोलिसांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन हा अड्डा उध्वस्त करण्याची मागणी होत आहे.पोलिसांची कर्तव्यपरायणता ठोस स्वरुपात व्हावी अशीच अपेक्षा अनेकांनी नाव न छापण्याच्या अटीवर बोलून दाखविली आहे.नाही तर पोलिसांचे दुर्लक्ष की आशिर्वाद असे बोलण्यात नागरिकांना संधी सापडू नये अशीच धडक कारवाईची मागणी आहे.






