Home मुंबई मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालय त्रिमूर्ती परिसरात शालेय विध्यार्यांच्या सोबत प्रदूषणमुक्त...

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालय त्रिमूर्ती परिसरात शालेय विध्यार्यांच्या सोबत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20221020-WA0176.jpg

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालय त्रिमूर्ती परिसरात शालेय विध्यार्यांच्या सोबत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई (अंकुश पवार,मुंबई जिल्हा प्रतिनिधी तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष, युवा मराठा न्यूज)

मंत्रालय मुंबई येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालय त्रिमूर्ती परिसरात शालेय विध्यार्यांच्या सोबत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १८ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान खादी महोत्सव देखील याच त्रिमूर्ती परिसरात सुरू झाला आहे. यासंदर्भात उद्योग विभाग व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील ग्रामीण कारागिरांनी हाताने अत्यल्प यंत्रसामग्री वापरून उत्पादित केलेल्या शुद्ध व पारंपारिक वस्तूंचे / खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री दिनांक १८ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत त्रिमूर्ती हॉल, मंत्रालय येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
ग्रामीण कारागिरांनी स्वतःच्या हातांनी मेहनतीने उत्पादित केलेल्या वस्तू जसे शुद्ध A2 गाईचे तूप व इतर दुग्ध उत्पादने , जळगाव येथील केळी पासून बनवलेली अनेक खाद्यपदार्थ , सेंद्रिय व गावरान कडधान्य, पापड, रत्नागिरीचे काजू , सांगलीची हळद व बेदाणे, खादी कपड्या पासून बनवलेले रेडिमेट गारमेंट्स , लाकडाच्या सुबक मूर्ती, इत्यादी अनेक उत्पादने येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. आपण या प्रदर्शनास भेट देऊन , मोठ्या प्रमाणात या ग्रामीण कारागिरांनी उत्पादित केलेली उत्पादने खरेदी करावी, जेणेकरून ग्रामीण अर्थव्यवस्थेस आपला हातभार लागेल , भारताच्या माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार “व्होकल फोर लोकल” या मोहिमेस गती मिळेल व या ग्रामीण कारागिरांची दिवाळी सुद्धा गोड होईल.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मधील विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांना या कार्यक्रमाला आवर्जून आमंत्रित करून कोरोना नंतरचे ही दिवाळी नियम मुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी सगळ्यांनी प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हाच संकल्प शपथ मुख्यमंत्री या कार्यक्रमाद्वारे सर्व नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here