Home नांदेड अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या निधी बाबतआझाद ग्रुप फाउंडेशन च्या वतीने तहसीलदाराना निवेदन.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या निधी बाबतआझाद ग्रुप फाउंडेशन च्या वतीने तहसीलदाराना निवेदन.

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20221020-WA0169.jpg

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या निधी बाबतआझाद ग्रुप फाउंडेशन च्या वतीने तहसीलदाराना निवेदन.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर:  दिनांक १९/१०/२०२२ रोजी देगलूर येथील तहसीलदार साहेबांना आजाद फाउंडेशन संचलित आझाद ग्रुप शाखा देगलूर च्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या निधी बाबत निवेदन देण्यात आले.जून जुलै ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात पिकांची नुकसान झाले. शासनाने मोठ्या गाजावाजा करत हेक्टरी१३६०० रुपये व मर्यादा तीन हेक्टर पर्यंत अशी या शासनाने घोषणा केली होती पण अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ही मदत बघितली तर त्या शेतकऱ्याची सरळ सरळ थट्टा मस्करी या शासनाने केलेली आहे. देगलूर परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १ हेक्टरी ५०००रू.तर कोणाला ६०००रू. अशी तुटपुंजी मदत शेतकऱ्याच्या खात्यावर बघायला भेटत आहे. अशी दिशाभूल या सरकारने या गोरगरीब शेतकऱ्यांशी केलेला आहे त्यातल्या त्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने तर या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलेले आहे
दरवेळी प्रमाणे हार गावांना एक तारीख देऊन त्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. देगलूर तालुक्यातील काही गावांना दुष्काळी मदतीचे पैसे मराठी डिसेंबर जानेवारी ची तारीख देण्यात आलेली आहे. एकीकडे सरकार सांगते की शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल पण या बँकेच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात होत असताना दिसते आहे. तरी शासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशा पद्धतीने दिली जाईल व लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड व्हावी यासाठी प्रयत्न करावे अशा आशयाचे निवेदन देताना आझाद ग्रुप फाउंडेशन देगलूर चे शहर उपाध्यक्ष ईश्वर देशमुख शहर कोषाध्यक्ष शिवराज चेडके शहर सचिव वैजनाथ स्वामी शहर संघटक मलिकार्जुन कडलवार शहर प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत गजलवार शहर कार्याध्यक्ष चंद्रशेखर पतुलवार शहर सहसंघटक राजू स्वामी शहर सहसचिव संतोष पैलावार शहर जनसंपर्क अमोल शिंदे पत्रकार महादेव उपे सर आदी मंडळी उपस्थित होते.यावेळी आझाद ग्रुप फाउंडेशन देगलूर च्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल असे आजाद ग्रुप फाउंडेशन देगलूर चे शहर अध्यक्ष संतोष मनधरणे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here