Home अमरावती ३८ दिवसानंतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगिती.

३८ दिवसानंतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगिती.

79
0

आशाताई बच्छाव

IMG_20231201_083557.jpg

३८ दिवसानंतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगिती.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
शासकीय सेवेत समायोजना करण्याचा प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी ५ ऑक्टोंबर २०२३ पासून बेमुदत का बंद आंदोलन सुरू केले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ३८ दिवसानंतर गुरुवारी आपले काम बंद संपाला स्थगिती दिली. परंतु आठ दिवसांमध्ये जर आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर १४ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर आंदोलन त्री व करून आक्रोश मोर्चाचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. शासकीय सेवेत समायोजना करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी २५ ऑक्टोंबर २०२३ पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. अमरावती जिल्ह्यातील जवळपास१३५२ अधिकारी व कर्मचारी या संपामध्ये सहभागी होते. त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य यंत्रणा ढासळली होती. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारे आंदोलन करून शासनाचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यंदाची दिवाळी देखील कर्मचाऱ्यांनी संपव मंडपात साजरी केली. तसेच ३१ ऑक्टोंबर ला मुंबई आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दहा वर्ष सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना ३० टक्के थेट सेवा समावेशन व ७० टक्के सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवून धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. तसेच २९ नोव्हेंबरला आरोग्यमंत्र्याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चेनंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद संपायला काही दिवसाची स्थगिती दिली आहे. परंतु जर आरोग्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र १४ डिसेंबरला अधिवेशन वरती जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहणार असल्याचा विचारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Previous articleखासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे युवासेना तालुका च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न.!
Next articleनरंगल ता देगलुर येथील सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here