Home गडचिरोली नक्षवालद्याना मदत करणाऱ्या तीघांना गडचिरोली पोलिसांनी केली अटक,सरकारी एमबिबिएस डॉक्टरसह तीन नक्षल...

नक्षवालद्याना मदत करणाऱ्या तीघांना गडचिरोली पोलिसांनी केली अटक,सरकारी एमबिबिएस डॉक्टरसह तीन नक्षल समर्थक यांच्या समावेश।

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220729-WA0058.jpg

नक्षवालद्याना मदत करणाऱ्या तीघांना गडचिरोली पोलिसांनी केली अटक,सरकारी एमबिबिएस डॉक्टरसह तीन नक्षल समर्थक यांच्या समावेश।

यात कमलापुर प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैधकिय अधिकार्याचा समावेश

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): नक्षलवाद्याना मदत करण्याच्या आरोपात सरकारी एमबिबिएस डॉक्टरासह तीन नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली.पोलिसाची गस्त सुरु असतांना नक्षल्यांचे शहिद सप्ताहाचे बँनर लावताना हे तीघे सापडले.अटक केलेल्यामध्ये कमलापुर प्राथमीक आरोग्य केंद्राच्या एमबिबिएस डॉक्टर पवन ऊईकेचा समावेश आहे.डॉक्टरासह या तीघांनकडुन नक्षल्यांना रसद पुरविली जात असल्याचा संशय आहे.या तिघांनवर बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करणे या कलमासह कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोली पोलिस पथकाची कारवाई

गडचिरोली जिल्हातील कमलापुर भागात काही अज्ञात व्यक्ती नक्षलवाद्यांना बांधत असल्याची माहिती पोलिस विभागाच्या हाती लागली गुप्त पध्दतीने पोलिस विभागाचे काही कर्मचारी जंगलात लपुन याची माहिती घेत होते. कमलापुर येथे प्राथमीक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेला एक एमबिबिएस डॉक्टरासह तीन आरोपीना अटक करण्यात आली.पोलिस पथक गडचिरोली यांनी ही अटक केली.

सरपंचाची नक्षल्यानी केली होती हत्या

गडचिरोली जिल्हातील भागात नक्षलवाद्याची दहशद निमार्ण करण्यासाठी हे बँनर नक्षलवादी नेहमी जंगल भागात किंव्हा रस्त्याच्या अलिकडे पलिकडे लावत असतात.या आठवडय़ात एका सरपंच्याची नक्षवालद्यानी हत्या केली होती.त्याच पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलिस अलट राहुन प्रत्येक भागात ऑपरेशन राबवत होते.ऑपरेशन राबवित असतांना बँनर लावण्यात सहभागी होते.यावेळी त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.

डॉक्टरवर दबावाची शक्यता

अहेरी तालुक्यातील कमलापुर हा भाग नक्षवांद्याचा माहेरघर मणुन ओळखला जातो.या घटनेमुळे चागलीच खळबळ उडाली, डॉक्टर स्वखुशीने हे सारे करत होता कि,त्याच्यावर दबाव होता,याचा शोध पोलिसांना घ्यावा लागनार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here