Home गडचिरोली मेडिकल कॉलेज जमिनीच्या पाहणीसाठी आलेल्या दिल्ली एम्सच्या टीमसोबत आमदार डॉ देवरावजी होळी...

मेडिकल कॉलेज जमिनीच्या पाहणीसाठी आलेल्या दिल्ली एम्सच्या टीमसोबत आमदार डॉ देवरावजी होळी यांची चर्चा

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220729-WA0047.jpg

मेडिकल कॉलेज जमिनीच्या पाहणीसाठी आलेल्या दिल्ली एम्सच्या टीमसोबत आमदार डॉ देवरावजी होळी यांची चर्चा

मेडिकल टीमचे आमदार महोदयांनी केले स्वागत      गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुख्यमंत्री व उपमुख्यमत्री यांनी गडचिरोली मेडिकल कॉलेजच्या जमीन पाहणीसाठी पाठविली एम्स मेडिकलची टीम

मेडिकल कॉलेजच्या कामाची तातडीने दखल घेतल्याबद्दल आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार

कृषी महाविद्यालयाच्या व त्या लगत लागून असलेल्या जलसंपदा विभागाच्या बाजूची, रुग्णालयाच्या मागील जागेची तसेच खाजगी जागेचीही केली पाहणी

गडचिरोली जिल्ह्यात नुकतेच मंजूर केलेले मेडिकल कॉलेज लवकरात लवकर सुरू व्हावे त्याची तातडीने दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री ना .एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली मेडिकल कॉलेजच्या जमिनीच्या पाहणीसाठी दिल्लीहून मेडिकल टीम पाठवली. त्या टीमची आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी पोलीस विश्रामगृहात भेट घेतली व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिलजी रूढे वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज तातडीने सुरू व्हावे याकरिता आमदार डॉ देवरावजी होळी मागील दिवसांपासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात असून त्याची दखल घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोली मेडिकल कॉलेजच्या जमिनीसाठी दिल्लीहून मेडिकल टीमला पाठविली

जमिनीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मेडिकल टीमने जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागून असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या व त्या लगत लागून असलेल्या जलसंपदा विभागाच्या बाजूची, रुग्णालयाच्या मागील जागेची तसेच खाजगी जागेचीही पाहणी केली. त्यानंतर मेडिकल कॉलेजला आवश्यक असलेल्या जमिनी संदर्भात त्यांनी आमदार महोदयांशी चर्चा केली.
मेडिकल कॉलेजच्या संदर्भातील मागणीची तातडीने दखल घेऊन मेडिकल टीम पाठवल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहे.

Previous articleनक्षवालद्याना मदत करणाऱ्या तीघांना गडचिरोली पोलिसांनी केली अटक,सरकारी एमबिबिएस डॉक्टरसह तीन नक्षल समर्थक यांच्या समावेश।
Next articleअकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान भरपाईची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here