Home परभणी माणकेश्वर ते बामणी रस्त्याचे काम थातुर मातुर झाल्याने प्रवाशांचे तसेच वाहन धारकांचे...

माणकेश्वर ते बामणी रस्त्याचे काम थातुर मातुर झाल्याने प्रवाशांचे तसेच वाहन धारकांचे हाल

151
0

आशाताई बच्छाव

IMG-20221009-WA0049.jpg

माणकेश्वर ते बामणी रस्त्याचे काम थातुर मातुर झाल्याने प्रवाशांचे तसेच वाहन धारकांचे हाल

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क )

परभणी :- जिंतूर मार्गावरील माणकेश्वर ते बामणी रस्त्याचे काम थातुर मातुर झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.तसेच रस्ता लहान असल्याने वाहणे चालवणे ही अवघड झाले आहे.
बामणी परिसरातील अनेक गावांचे येलदरी धरणामुळे पुनर्वसन झालेले आहे.बामणी, अंबरवाडी, संक्राळा, कोलपा, कुंबेफळ, सावंगी(भां), या सह ०६ गावे व सदर गावकर्‍यांची हजारो एक्कर शेती येलदरी धरणामुळे पाण्यात गेली आहे. शासनाने पाहिजे तसा शेतीचा मोबदला तर दिला नाहीच आणि झालेल्या पुनर्वसनासाठी योग्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत.त्यात या गावांना तालुक्याच्या ठिकाणी दळण-वळणासाठी जाण्यास चांगल्या रस्त्याची व्यवस्था सुद्धा केलेली नाही.खराब रस्त्यामुळे अनेक महिलांच्या प्रसूती या रस्त्यावर झाल्याचे उदाहरणे आहेत.दुचाकीस्वार यांचे मान,पाठ,कंबरडे मोडले आहे.कधी या रस्त्याची दुरूस्ती आली तर स्थानिक चे नेतेमंडळी हे काम कंत्राटदाराकडून घेतात आणि काम थातूरमातूर करून बिले उचलतात असे प्रकार बर्‍याच वेळा झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर येऊन पाहणी करून हा रस्ता त्वरित मंजूर करून रुंद व मजबुतीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Previous articleमुल्हेर येथे रास क्रीडा उत्सव संपन्न.
Next articleसंग्रामपूर तालुक्यात मानव विकास मिशन कार्यक्रमांचा अनागोंदी कारभार मंजूर72 शिबिरांपैकी 1आरोग्य केंद्रावर मात्र 3 शिबिर संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here