Home नाशिक मुल्हेर येथे रास क्रीडा उत्सव संपन्न.

मुल्हेर येथे रास क्रीडा उत्सव संपन्न.

102
0

आशाताई बच्छाव

IMG-20221010-WA0001.jpg

मुल्हेर येथे रास क्रीडा उत्सव संपन्न.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी उद्धव महाराज यांचे समाधी स्थळ आहे. सालाबादा प्रमाणे यावर्षी सुध्दा रासक्रिडा उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. या समाधी स्थळाचे आजचे मठाधिपती भक्तराज महाराज यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे महत्त्व असे की हा सोहळा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भारतात वृंदावन व मुल्हेर या दोनच ठिकाणी साजरा होत असतो. प्रथम उद्धव महाराज यांच्या पादुकांचे रथ मिरवणूक होते. तसेच सायंकाळी सात वाजता साधारण 101 फुटाचे गोलाकार चक्र केळीच्या पानाने व बांबूच्या साह्याने चक्र सजवले जाते व हे चक्र समाधी स्थळाच्या प्रांगणात एका लाकडी खांबावर ठेवले जाते. हे चक्र पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत गोलाकार फिरवले जाते. असे मानले जाते कि हे चक्र श्रीकृष्ण यांच्या सुदर्शन चक्राचे प्रतीक आहे. म्हणून याला गोल फिरवले जाते. त्यानंतर संस्थांच्या देवघरापासून लहान मुले, मुली यांना गोपिकांचा वेषांतर करून देवघरापासून समाधी स्थळ अशी मिरवणूक काढली जाते व ही मिरवणूक समाधी स्थळापर्यंत आल्यावर पारंपारिक वाद्य वाजवुन आनंद होतो साजरा होत असतो. मंदिरात आल्यावर महाआरती होते त्यानंतर रात्रभर भक्तगन भजन कीर्तन साजरा करत असतात. तसेच याप्रसंगी गावातील समाजसेवकां कडून अन्नदान केले जाते. या दिवशी समाधी परिसरात यात्रेचे स्वरूप आले असते. या उत्सवाचे व समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी मूल्हेर, अंतापुर, ताहाराबाद, करंजाड,नरकुळ, जाखोड. अशा बहुतांश गावातील महिला पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात. हा उत्सव रात्रीचा असल्याने भाविकांबाबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शना खाली जायखेडा पोलीस स्टेशन व मूल्हेर दूरक्षेत्र यांचे पोलीस कर्मचारी रात्रभर आपले कर्तव्य बजावत होती

Previous articleवानखेड वान नदीपात्रात वाळू तस्करी ला महसूल विभागाचे खुले अभय.! “जनता त्रस्त तहसीलदार मस्त”
Next articleमाणकेश्वर ते बामणी रस्त्याचे काम थातुर मातुर झाल्याने प्रवाशांचे तसेच वाहन धारकांचे हाल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here