Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्यात मानव विकास मिशन कार्यक्रमांचा अनागोंदी कारभार मंजूर72 शिबिरांपैकी 1आरोग्य केंद्रावर...

संग्रामपूर तालुक्यात मानव विकास मिशन कार्यक्रमांचा अनागोंदी कारभार मंजूर72 शिबिरांपैकी 1आरोग्य केंद्रावर मात्र 3 शिबिर संपन्न

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20221009-WA0042.jpg

संग्रामपूर तालुक्यात मानव विकास मिशन कार्यक्रमांचा अनागोंदी कारभार

मंजूर72 शिबिरांपैकी 1आरोग्य केंद्रावर मात्र 3 शिबिर संपन्न

युवा मराठा वेब न्युज पोर्टल
प्रतिनिधी रविंद्र शिरस्कार संग्रामपुर

संग्रामपूर तालुक्यातील मानव विकास मिशन योजनेअंतर्गत गरोदर माता स्तनदा मातेसह बालकांची तज्ञांकडून मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र आदिवासी बहूल अतिदुर्गम असलेल्या संग्रामपूर तालुक्यात मोफत आरोग्य तपासणीसाठी मंजूर 72 शिबिरांपैकी केवळ तीनच शिबिर घेण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. संग्रामपूर तालुक्यात सोनाळा, संग्रामपूर, पातुर्डा, वानखेड हे चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून 16 उपकेंद्र आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी 18 प्रमाणे 72 शिबिरे होणे अपेक्षित आहेत. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात संग्रामपूर येथील एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपकेंद्र बोडखा, उपकेंद्र वकाना, उपकेंद्र निवाणा, उपकेंद्र पळशी अंतर्गत येणाऱ्या गावांसाठी 3 शिबिर घेण्यात आले. यामध्ये गरोदर व स्तनदा मातेसह 0 ते6 महिने वयोगटातील 96 बालकांची तपासणी करण्यात आली आहे. तर पातुर्डा, वानखेड तसेच आदिवासी बहुल गावे सामाविष्ट असलेले सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकही शिबिर घेण्यात नसल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध योजना व उपक्रम राबवून स्त्रीरोग तज्ञांकडुन गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी तसेच 0ते 6 महिने वयोगटातील बालकांची व स्तनदा मातांची तपासणी करून औषधोपचार करण्यासह दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलांना बुडीत मजुरीपोटी 800 रूपये गरोदरपणातील नवव्या महिन्यात देणे बंधनकारक आहे. तो ही लाभ दिला जात नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

जानेवारीत 4 लाख 85 हजाराचा निधी उपलब्ध

सन 2021-22 या वर्षासाठी 19 जानेवारी 2022 ला मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत तपासणी शिबिरासाठी 7 तालुक्यांना 51 लाख 84 हजार रुपयांचा निधी देण्यात आला. यामध्ये संग्रामपुर तालुक्याला 4 लाख 86 हजार रुपयांचा निधी मिळाला.

संग्रामपूर तालुक्यात 60 बालकांचे मृत्यू

वर्षभरात तालुक्यात 1 हजार 807 बालकांचा जन्म झाला असून एका मातेसह एकूण 60 बालकांचे मृत्यू झाले आहे. त्यात उपजत 23 तर 0 ते 1 वर्षे बालकांचे37 मुत्यू झाल्याचे स्पष्ट अहवालात नमूद आहे.

(निधी अभावी मोजकेच शिबिर घेण्यात आले. आवश्यक निधी उपलब्ध झाल्यावर गरोदर, स्तनदा मातेसह बालकांचे तपासणी शिबिर घेण्यात येणार)

डॉ. प्रमोद रोजतकार 
तालूका आरोग्य अधिकारी
संग्रामपूर

( गर्भवती माता व बालकांकडे आरोग्य विभागाचे अकार्यक्षम दुर्लक्षामुळे आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यासाठी धोक्याची घंटा आहे. या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे झाले आहे. )

भाऊ भोजने 
सामाजिक कार्यकर्ते
वरवट बकाल

Previous articleमाणकेश्वर ते बामणी रस्त्याचे काम थातुर मातुर झाल्याने प्रवाशांचे तसेच वाहन धारकांचे हाल
Next articleअनसिंग येथे जिवाजी महाले यांची जयंती ढोल ताशांच्या गजरात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here