Home वाशिम अनसिंग येथे जिवाजी महाले यांची जयंती ढोल ताशांच्या गजरात साजरी

अनसिंग येथे जिवाजी महाले यांची जयंती ढोल ताशांच्या गजरात साजरी

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20221011-WA0004.jpg

अनसिंग येथे जिवाजी महाले यांची जयंती ढोल ताशांच्या गजरात साजरी

वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी) जिल्ह्यातील अनसिंग येथे जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला नाभिक दुकानदार संघटना व सकल नाभिक समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने अनसिंग शहरात शिवरत्न जिवाजी महाले यांची 387 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नाभिक कुटुंबातील शिवरत्न जिवाजी महाले नी आपल्या पराक्रमाने नाव देशासह जगात पोहचवले स्वराज्यावर आलेली सुनामी हवेतल्या हवेत गारद केली म्हणूनच होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी यांची इतिहासात नोंद झाली. या कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील सर्व आजू बाजूच्या खेड्यातील समाज बांधवांनी खूप काही प्रतिसाद दिला व जिवाजी महाले च्या शोभा यात्रे मध्ये सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवली. कार्यक्रमा नंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम जैन मंदिर समोर हनुमान मंदिरावर करण्यात आला व समाजातील लोकांनी शोभा यात्रा मिरणुक काढल्या मुळे आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here