Home पुणे महाराष्ट्र संघ दुहेरी मुकुटाचा मानकरी फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धा : उत्तर प्रदेश,...

महाराष्ट्र संघ दुहेरी मुकुटाचा मानकरी फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धा : उत्तर प्रदेश, राजस्थान उपविजेते

113
0

आशाताई बच्छाव

IMG-20221010-WA0033.jpg

महाराष्ट्र संघ दुहेरी मुकुटाचा मानकरी

फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धा : उत्तर प्रदेश, राजस्थान उपविजेते

पुणे / प्रतिनिधी उमेश पाटील: महाराष्ट्राच्या मुलांनी उत्तर प्रदेश संघाला तर मुलींनी राजस्थान संघाला पराभूत करताना महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण बडवे इंजिनियरिंगच्या संचालिका सुप्रिया बडवे, उद्योगपती सुजित जैन, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संचालक अमेय येरवडेकर व महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, आशियाई रोलबॉल संघटनेचे सचिव आनंद यादव, भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा रोलबॉल संघटनेच्या बाणेर येथील मैदानावार सुरु असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघाला १०-५ असे पराभूत केले. मध्यंतराला महाराष्ट्राने ५-२ अशी तीन गोलची आघाडी घेतली होती. महाराष्ट्र संघाकडून हर्षल घुगे (१२.३०, २३.४१, ३३.२५ मिनिटे) व अमितेश बोधाडे (१४.१५, २७.१२ ३२.५० मिनिटे) यांनी प्रत्येकी ३, आदित्य गणेशवाडेने २ (३.४५, ३०.५५ मिनिटे) तर अथर्व धायगुडे (०.३८ मिनिट) व मधुसुधन रत्नपारखी (३९.०३ मिनिटे) यांनी प्रत्येकी १ गोल केला. उत्तर प्रदेश संघाकडून सचिन सैनीने २ (६.१५, ४२.४६ मिनिटे), गोविंद गौर (११.४८ मिनिटे), विशाल वर्मा (१५.०९ मिनिटे) व खेतान सैनी (३९.३३ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाने राजस्थान संघाला ६-१ असे पराभूत केले. महाराष्ट्र संघाने मध्यंतराला ३-१ अशी २ गोलांची आघाडी घेतली. महेक राउतने ३ (१८.५१, २६.२९, ४६.४९ मिनिटे) ३ तर श्रुती भगतने २ (१.०७, १४.०२ मिनिटे) व सई शिंत्रेने १ (२७.१९ मिनिटे) गोल केला. राजस्थान संघाकडून प्रीतीका तारावतने (४८.१३ मिनिटे) एकमात्र गोल केला.

तत्पूर्वी तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या मुलांच्या गटाच्या लढतीमध्ये गोवा संघाने मध्य प्रदेश संघाला ५-४ असे पराभूत केले. गोवा संघाकडून श्रेयस बोंबलेने ५ (१२.२४, १४.५२, २३.०९, ३४.२२, ४९.२० मिनिटे) गोल केले. मध्य प्रदेश संघाकडून आदित्य अवस्थीने २ (२९.५५, ४४.४९ मिनिटे) तर आदित्य राणावत (३०.४२ मिनिटे) व गुरुवचन सिंग (३२.०२ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

मुलींच्या तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये झारखंड संघाने छत्तीसगड संघाला ७-३ असे पराभूत केले. मध्यंतराला झारखंड संघाने ५-२ अशी आघाडी घेतली. झारखंड संघाकडून इशा सोनकर (२७.५८, २९.४४, ३८.२४ मिनिटे) व लव्हली कुमारी (२१.४०, ४३.०७, ४८.४७ मिनिटे) यांनी प्रत्येकी ३ तर उझ्मा खानमने (२.५५ मिनिट) एक गोल केला. छत्तीसगड संघाकडून इशा साहूने ३ (१०.४५, ४६.३५, ४९.०१ मिनिटे) गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.
————-

Previous articleअनसिंग येथे जिवाजी महाले यांची जयंती ढोल ताशांच्या गजरात साजरी
Next articleपंढरपूर प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here